देशसेवेसाठी २०४ सशस्त्र सैनिक तयार

By Admin | Published: May 29, 2016 03:08 AM2016-05-29T03:08:58+5:302016-05-29T03:08:58+5:30

कामठी येथील गार्डस् रेजिमेंट सेंटर येथे तब्बल ३४ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर २०४ सैनिक आता देशाच्या संरक्षणासाठी लढण्यास सज्ज झाले आहेत.

Prepare 204 armed soldiers for the country's service | देशसेवेसाठी २०४ सशस्त्र सैनिक तयार

देशसेवेसाठी २०४ सशस्त्र सैनिक तयार

googlenewsNext

गार्डस् रेजिमेंट सेंटर : खडतर प्रशिक्षणानंतर सैनिकाचा दर्जा
नागपूर : कामठी येथील गार्डस् रेजिमेंट सेंटर येथे तब्बल ३४ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर २०४ सैनिक आता देशाच्या संरक्षणासाठी लढण्यास सज्ज झाले आहेत. रेजिमेंट सेंटर येथे दीक्षांत समारंभात या रिक्रूटस्ना सशस्त्र सैनिकांचा दर्जा बहाल करण्यात आला.
या सैनिकांनी परेड केली. या सैनिकांच्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी खास प्रशिक्षित करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने रेजिमेंट दंंडपाल यांच्याकडून त्यांनी आपल्या कर्तव्याप्रति त्याग आणि बलिदानाची शपथ घेतली. या प्रशिक्षणादरम्यान सर्व क्षेत्रात चंद्रगुप्त ट्रेनिंग कंपनीचे रिक्रूट राजेश कुमार यादव यांना सर्वश्रेष्ठ रिक्रूट ट्रॉफी प्रदान करण्यात आली. रेजिमेंट सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर डी.व्ही. सिंह यांनी परेडचे अवलोकन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Prepare 204 armed soldiers for the country's service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.