Corona Virus in Nagpur; घरी बाळंतपणाची तयारी अन् वडिल आहेत आजारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:41 PM2020-04-17T17:41:52+5:302020-04-17T17:42:41+5:30

अनेक संकटाचा सामना करून विजयी पताका फडकावतो, तो योद्धा ठरतो. वर्तमान कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर्स असेच योद्धे म्हणून समाजापुढे उभे राहत आहेत.

Prepare for childbirth at home and father is ill! | Corona Virus in Nagpur; घरी बाळंतपणाची तयारी अन् वडिल आहेत आजारी!

Corona Virus in Nagpur; घरी बाळंतपणाची तयारी अन् वडिल आहेत आजारी!

Next
ठळक मुद्देआशिष बैनलवार क्वॉरंटाईन सेंटरमधून रुग्णांची घेत आहेत काळजी

प्रवीण खापरे /
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक संकटाचा सामना करून विजयी पताका फडकावतो, तो योद्धा ठरतो. वर्तमान कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर्स असेच योद्धे म्हणून समाजापुढे उभे राहत आहेत. एकीकडे या युद्धात ते आघाडीवर आहेत आणि दुसरीकडे याच आघाडीवरील योद्धयांना आपमतलबी लोकांच्या दुष्ट प्रवृत्तीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही ही वैद्यकीय आघाडी आपल्या कर्तव्यापासून जराही डगमगलेली नाही. संसर्गाच्या सावटातही ही आघाडी मैदानात दटून आहे आणि एखाद्या वॉरिअर प्रमाणे महाभयंकर अशा कोरोना नावाच्या सुक्ष्म दैत्याची दोन दोन हात करत अडिगतेने उभे आहेत. यापैकी काहींना तर एकाच वेळी दोन दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. एक क्वॉरंटाईन सेंटर अन् दुसरे कुटूंब! तरी देखील ते जराही खजिल पडलेले नाही आणि या दोन्ही आघाड्या ते लिलया पेलत असल्याचे दिसून येते.
शहरात कोरोनाचा जसा शिरकाव झाला तशा प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या. डॉक्टरांची फळीही उभी झाली आणि अल्पावधितच सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवासाला प्रमुख क्वॉरंटाईन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले. या सेंटरमध्ये युद्धपातळीवर संशयितांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. याच कार्यात नागपूरचे युवा चिकित्सक डॉ. आशिष बैनलवार आहेत. त्यांच्यासारखे अनेक आहेत. डॉ. आशिष यांच्या पत्नी प्रेग्नंट असून, नववा महिना लागला आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे लवकरच एका रत्नाचे आगमन होणार आहे. तर त्यांचे वडील अपलॅस्टिक एनिमियाने ग्रस्त आहेत. या आजारात त्यांना सतत कृत्रित रक्तपुरवठा करावा लागतो. अशा स्थितीत पती म्हणून पत्नीची काळजी घेणे आणि एक पुत्र म्हणून वडिलांची देखरेख करणे, हे आद्य कर्तव्य आहे. शिवाय, त्यांना एक पाच वर्षाची मुलगी देखील आहे आणि तिच्याकडेही एक बाप म्हणून लक्ष पुरविणे आलेच. अशा स्थितीतही डॉ. आशिष आपल्या डॉक्टर या सर्वप्रथम कर्तव्याचे निर्वहन करत आहेत, हे विशेष आणि हिच बाब रुग्ण आणि लॉकडाऊनच्या काळात कायद्या धाब्यावर बसवणाऱ्यांनी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. डॉ. आशिष हे १८ मार्चपासूनच या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये इतर सहकाऱ्यांसोबत आपले कर्तव्य बजावत आहेत. डॉ. आशिष यांच्यासारखेच अनेक डॉक्टर एकाच वेळी दोन आघाड्या सांभाळत आपले कर्तव्य बजावत आहेत, हे विशेष.

शासनाचे प्रोटोकॉल पाळा - आशिष बैनलवार
: या स्थितीत नागरिकांनी शासनाशिवाय कुणाचेच प्रोटोकॉल पाळू नये. लॉकडाऊनचे पूर्ण पालन करा अन्यथा अंतिम प्रवासाला लागा, अशीच वर्तमान स्थिती आहे. अत्यंत मजबूत अशी वैद्यकीय क्षमता असलेल्या अमेरिका, इटली सारखे देश कोरोनापुढे हतबल झाले, ते आपण काहीच नाही. तरी देखील शासनाने लागलिच केलेल्या उपाययोजनांमुळे भारत अजूनही मजबूत आहे. त्याचा विचार करावा, असे आवाहन डॉ. आशिष बैनलवार यांनी क्वॉरंटाईन सेंटरमधून केले आहे.

घरी जातो पण कुणाशीच भेटत नाही
: दररोज घरी गेलो की आपल्या खोलित स्वत:ला बंद करून घेतो. वडील घरी आहेत, त्यांच्याकडे सतत लक्ष पुरवावेच लागते. दररोज रक्त बदलून घ्यावे लागते. पत्नीला माहेरी पाठवले आहे. मात्र, दररोज फोनवर बोलणे होत असते, असे डॉ. आशिष यांनी सांगितले.

Web Title: Prepare for childbirth at home and father is ill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.