एनयुएचएमचे प्रस्ताव तीन दिवसात तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:09 AM2021-01-16T04:09:55+5:302021-01-16T04:09:55+5:30

महापौरांचे निर्देश -आरोग्य विभागाची बैठक नागपूर, : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयुएचएम) महापालिकेद्वारे शहरात ७५ हेल्थ पोस्ट ...

Prepare NUHM's proposal in three days | एनयुएचएमचे प्रस्ताव तीन दिवसात तयार करा

एनयुएचएमचे प्रस्ताव तीन दिवसात तयार करा

Next

महापौरांचे निर्देश -आरोग्य विभागाची बैठक

नागपूर, : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयुएचएम) महापालिकेद्वारे शहरात ७५ हेल्थ पोस्ट तयार करण्यात येणार आहेत. याबाबाबतचे प्रस्ताव तीन दिवसात तयार करा, शहरात ज्या भागात लोकसंख्येनुसार आरोग्य यंत्रणा अपुरी आहे किंवा मुळीच नाही अशा भागांचे सर्वेक्षण करून हेल्थ पोस्टसाठी जागा निवडण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

महापौरांनी शहराच्या आऊटर भागात ७५ हेल्थ पोस्ट तयार करण्याची घोषणा केली होती. याला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. शहराच्या आऊटर भागातील सर्व नगरसेवकांचे जागेसंदर्भात मत जाणून घेण्यासाठी १८ जानेवारी रोजी बैठक घेणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.

हेल्थ पोस्टच्या निर्मितीमुळे गरीब तसेच सर्वसामान्य लोकांना मोठी मदत होईल. जुन्या रचनेतील वॉर्डाच्या धर्तीवर ही यंत्रणा उभारण्याची सूचनाही बैठकीत महापौरांनी केली. शहरात रुग्णवाहिका जननी सुरक्षा सेवा सर्व तळागाळातील नागरिकांना मिळावी यासाठी लहान मारुती वॅनचा उपयोग करण्याची सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. रुग्णवाहिका थेट वस्तीत रुग्णाच्या दारासमोर नेऊन तात्काळ रूग्णालयात पोहचविण्यास मदत होईल, असे महापौर म्हणाले. यावेळी उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: Prepare NUHM's proposal in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.