कजरी गीत अन् छत्तीसगढी लोकनाट्यांचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 08:07 PM2020-08-24T20:07:59+5:302020-08-24T20:10:29+5:30
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मासिक उपक्रमांतर्गत बुंदेली परंपेतील कजरी गीत आणि छत्तीसगडचे पारंपरिक लोकनाट्य सादर झाले. या कार्यक्रमाला देशभरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मासिक उपक्रमांतर्गत बुंदेली परंपेतील कजरी गीत आणि छत्तीसगडचे पारंपरिक लोकनाट्य सादर झाले. या कार्यक्रमाला देशभरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
टाळेबंदी आणि संसर्गाच्या भीतीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बाधा पोहोचली असली तरी अनेक संस्थांनी व कलावंतांनी ऑनलाईन
सादरीकरणाचा पर्याय निवडला आहे. त्याच अनुषंगाने दमक्षेतर्फे सगळे उपक्रम ऑनलाईन स्वरूपात पार पाडले जात आहे. त्याच शृंखलेत कजरी गीत व लोकनाट्याचे सादरीकरण झाले. मध्य प्रदेशातील छत्तरपूरचे बेबी राजा आणि त्यांच्या चमूने बुंदेली परंपरेतील ‘कजरी गीत’ सादर करीत रसिकांचे मन मोहून घेतले. त्यानंतर छत्तीसगडचे पारंपरिक लोकनाट्य ‘नाचा’चे सादरीकरण आणि नाटकावर चर्चात्मक व्याख्यान पार पडले. यात राकेश तिवारी व त्यांचे सहकारी कलाकार यांनी गायनशैलीही प्रस्तुत केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन दमक्षेचे कार्यक्रम अधिकारी प्रेमस्वरूप तिवारी यांनी केले तर आभार गणपतलाल प्रजापती यांनी मानले.