राष्ट्रपती भाजपा महायुतीचाच

By admin | Published: May 28, 2017 02:33 AM2017-05-28T02:33:03+5:302017-05-28T02:33:03+5:30

आजवर सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार हे राष्ट्रपती बनले आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आवश्यक मतापेक्षा भाजपा महायुतीला

President of BJP Mahayuti | राष्ट्रपती भाजपा महायुतीचाच

राष्ट्रपती भाजपा महायुतीचाच

Next

रामदास आठवले : विरोधी पक्ष एकत्र आले तरी फरक पडणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजवर सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार हे राष्ट्रपती बनले आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आवश्यक मतापेक्षा भाजपा महायुतीला १८ हजार मते कमी पडत असली तरी ती मिळविणे फार कठीण नाही. विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी फरक पडणार नाही. राष्ट्रपती भाजपा महायुतीचाच होईल, असा दावा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आ.) अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होणार असल्याची चर्चा आहे. परंतु शरद पवार यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार होऊ नये. पवार हे कधीही हरण्यासाठी निवडणूक लढत नाही. त्यामुळे ते स्वत: राष्ट्रपती पदासाठी उभे राहणार नाही, असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या ७० वर्षांत जे झाले नाही, ते गेल्या तीन वर्षात करण्याचा प्रयत्न झाला. काही लोक संविधान बदलण्यात येणार असल्याचा आरोप करतात, परंतु भारताचे संविधान बदलले जाणार नाही तसेच आरक्षणही कायम राहील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. सहारनपूर येथील घटना ही चुकीचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, बाळू घरडे आदी उपस्थित होते.

दीक्षाभूमी हाच माझा संघ
भाजपाचे सरकार आले तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्व वाढले आहे. केंद्र व राज्यातील मंत्री व आमदाराने एकदा तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आहे. तेव्हा आपण केंद्रात मंत्री असल्याने आपणही रास्वसंघ मुख्यालयाला भेट देणार का? अशी विचारणा पत्रकारांनी आठवले यांना केली असता, त्यांनी दीक्षाभूमी हाच माझा संघ असल्याचे स्पष्ट केले. माझ्या पक्षाने भाजपाशी युती केली आहे, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्याचा प्रश्नच येत नाही.
रिपाइं ऐक्यासाठी
राजीनामा द्यायला तयार
रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.

 

Web Title: President of BJP Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.