राष्ट्रपती तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 10:58 PM2023-06-21T22:58:48+5:302023-06-21T22:59:10+5:30

Nagpur News राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ४ जुलैला तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.

President on a three-day visit to Vidarbha | राष्ट्रपती तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

राष्ट्रपती तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ४ जुलैला तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ, कोराडी येथील भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण व वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षान्त सभारंभाला त्या प्रमुख अतिथी राहतील.

राष्ट्रपतींचे ४ जुलैला सायंकाळी हैदराबाद येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. मुक्कामानंतर ५ जुलैला सकाळी त्या हेलिकॉप्टरने गडचिरोलीला येतील. सकाळी साडेदहाच्या दीक्षान्त समारंभानंतर नागपुरात येतील. सायंकाळी कोराडी येथे भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक केंद्राचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल.

६ जुलैला सकाळी हेलिकॉप्टरने वर्ध्याला जातील. साडेअकराच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यानंतर दुपारी दीड वाजता नागपूर विमानतळावरून मुंबईसाठी निघतील. मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, ७ जुलैला शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेऊन सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होतील.

राज्यपालांचा दौरा २३ पासून

वर्धा : राज्यपाल रमेश बैस २३ जूनपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. २४ जूनला ते सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देतील. दुपारी साडेतीनला ते सेवाग्राम येथे दाखल होतील. ५ जुलैला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे येणार आहेत. त्यानंतर वर्धा येथील आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय व सेवाग्राम आश्रमालाही भेट देतील.

Web Title: President on a three-day visit to Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.