नागपूर ग्रामीणचे ओमप्रकाश कोकाटे यांना राष्ट्रपती पोलिस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 20:54 IST2023-01-25T20:53:49+5:302023-01-25T20:54:29+5:30
Nagpur News केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा समावेश आहे.

नागपूर ग्रामीणचे ओमप्रकाश कोकाटे यांना राष्ट्रपती पोलिस पदक
नागपूर : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा समावेश आहे.
राज्य पोलिस दलातील चार पोलिस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, ३१ पोलिसांना ‘पोलिस शौर्यपदक’ तर ३९ पोलिसांना ‘पोलिस पदक’ जाहीर झाले. नागपूरमधील एकमेव पोलिस अधिकारी ओमप्रकाश कोकाटे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्यांना उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.