बोर्डावर निकाल घोषित करण्याचा दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:50 AM2019-05-25T00:50:18+5:302019-05-25T00:51:16+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यावर बोर्डावर दबाव वाढत आहे. औरंगाबाद व नाशिक विभागीय कार्यालयाकडून परीक्षेचे काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बोर्डाच्या निकालाचा मुहूर्त ठरविण्यास बोर्डाला अवघड जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यावर बोर्डावर दबाव वाढत आहे. औरंगाबाद व नाशिक विभागीय कार्यालयाकडून परीक्षेचे काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बोर्डाच्या निकालाचा मुहूर्त ठरविण्यास बोर्डाला अवघड जात आहे.
सूत्रांच्या मते बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही विभागीय कार्यालयाला २६ मेपर्यंत परीक्षेचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर निकालाची तिथी ठरेल, अशी शक्यता आहे. २८ मेपर्यंत ऑनलाईन निकाल घोषित होऊ शकतात. सूत्रांच्या सांगण्यानुसार औरंगाबाद व नाशिक विभागीय कार्यालयाला परीक्षेचे काम लवकरात लवकर संपविण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानंतरच निकालाची तारीख ठरविण्यात येणार आहे. सूत्रांच्या मते २२ मे रोजी सर्व विभागीय मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक मंडळाच्या मुख्यालयात झाली. यात परीक्षेच्या कामाची समीक्षा करण्यात आली. यात चार विभागीय कार्यालयाचे काम पूर्ण झाले नसल्याची माहिती आहे. २४ मेपर्यंत परीक्षेचे काम पूर्ण करायचे होते. या कालावधीत मुंबई व पुणे विभागीय कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नाशिक व औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे काम पूर्ण झालेले नाही.