नागपुरात राख्यांच्या किमतीत २० टक्के वाढ, कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 10:18 PM2018-08-24T22:18:07+5:302018-08-24T22:20:47+5:30

राखी जीएसटी मुक्त झाल्याने खरेदीचा उत्साह वाढला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Prices of Rakhi in Nagpur increase by 20 percent, Millennium turnover | नागपुरात राख्यांच्या किमतीत २० टक्के वाढ, कोट्यवधींची उलाढाल

नागपुरात राख्यांच्या किमतीत २० टक्के वाढ, कोट्यवधींची उलाढाल

googlenewsNext
ठळक मुद्देरजवाडी, स्टोन, कुंदन राख्यांना मागणी : खरेदीचा उत्साह वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राखी जीएसटी मुक्त झाल्याने खरेदीचा उत्साह वाढला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रत्येक भावासाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये अन्य सणांइतकेच या पारंपरिक सणाला महत्त्व आहे. काळानुसार या सणाचा ट्रेंड बदलला असला तरी लहान मुलामुलींपासून वृद्ध भावाबहिणींमध्येही रक्षाबंधनाचा उत्साह कायम असतो. यावर्षी रविवार, २६ आॅगस्टला रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. यंदा रजवाडी, स्टोन आणि कुंदन राख्यांना चांगली मागणी आहे. फॅन्सी, स्टायलिश राख्यांची सर्वाधिक विक्री होत आहे. आतापर्यंत ठोक बाजारात ८० टक्के स्टॉक विकण्यात आला आहे. युवती आणि महिलांची आकर्षक व अनोखे रंग, डिझाईन आणि पॅटर्नला जास्त पसंती आहे. शुक्रवारी महिलांनी इतवारी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती. राख्यांसोबत ग्रिटिंग कार्डला चांगली मागणी आहे. खरेदी करताना किमतीऐवजी रंगसंगतीला जास्त पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

२ ते ५०० रुपयांची राखी />बाजारपेठेत धाग्यापासून तयार केलेल्या राखीची किंमत दोन रुपयांपासून आहे. याशिवाय अनोख्या राख्या ५०० रुपयांपर्यंत आणि सराफांच्या दुकानात चांदीच्या राख्या पाच हजार रुपयांपर्यंत विक्रीस आहेस. दिवसेंदिवस राख्यांचा बाजार वाढत आहे. तुळशीचे मणी, रुद्राक्षांचा वापर केलेल्या राख्या बाजारात विक्रीस आहेत. लहान मुलांची कार्टुन राख्यांना पसंती आहे. इतवारीतील विक्रेत्याने सांगितले की, नागपुरातील व्यापारी मुंबई, अहमदाबाद, कोलकाता येथून कोट्यवधींच्या राख्या मागवितात. यंदा भाववाढीनंतरही व्यवसायात उत्साह आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने व्यवसाय होण्याचे संकेत आहेत. मध्यंतरी आलेल्या पावसामुळे लोकांमध्ये या सणाविषयी उत्साह दिसून येत आहे.

हॅण्डमेड राख्यांना पसंती
नागपुरात हॅण्डमेड राख्यांची निर्मिती गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. या राख्यांना सर्वस्तरातून मागणी दिसून येत आहे. गृहउद्योग करणाऱ्या महिला आणि बचत गटांतर्फे या राख्या तयार करण्यात येतात. सहा महिन्यांपासून राख्या तयार करण्याला सुरुवात होते. हॅण्डमेड राख्या निर्मितीला वेळ जास्त लागत असल्यामुळे हव्या तेवढ्या राख्यांची निर्मिती होत नाही, असे महिला बचत गटाच्या संचालकांनी सांगितले.

रक्षाबंधनात चॉकलेटची दुनिया
रक्षाबंधन सणात गोड पदार्थांची जागा आता चॉकलेटनी घेतली आहे. खास रक्षाबंधनासाठी बाजारात नामांकित कंपन्यांनी चॉकलेटच्या अनेक व्हेरायटीज दाखल केल्या आहेत. ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या चॉकलेटचे रक्षाबंधनासाठी तयार केलेले बॉक्सेस मिठाईच्या दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहेत. हे चॉकलेट लहानांबरोबरच तरुणांमध्येही लोकप्रिय ठरले आहेत. पेढे, जिलेबी, रसमलाई, श्रीखंड या पदार्थांपेक्षा रक्षाबंधनासाठी चॉकलेटलाच अधिक पसंती दिली जात असून रक्षाबंधनापूर्वी चॉकलेट खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. 

 

Web Title: Prices of Rakhi in Nagpur increase by 20 percent, Millennium turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.