मनपातील गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:43+5:302021-06-11T04:06:43+5:30
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका शिक्षण विभागातर्फे मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती ...
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका शिक्षण विभागातर्फे मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात सन २०२० चे गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. महापौर दयाशंकर तिवारी अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर आदी उपस्थित होते.
शिक्षकांची मेहनत आणि त्यातून घडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाचा हवा तसा प्रचार-प्रसार झाला नाही, म्हणून मनपाचा शिक्षण विभाग कायम उपेक्षित राहिला. आता या विभागाची कीर्ती सातासमुद्रापार पोहचविण्याची जबाबदारी शिक्षकांनीच उचलावी, असे आवाहन दयाशंकर तिवारी यांनी केले. मनीषा धावडे, प्रकाश भोयर, तानाजी वनवे व सभापती प्रा. दिलीप दिवे आदींनी मार्गदर्शन केले.
आदर्श शिक्षकांना स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, मनपाचा दुपट्टा देऊन महापौर व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुरेंद्रगड हिंदी उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मो. निसार शेख यांना मरणोत्तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी परवीन सुलताना निसार शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दहावी, बारावी, मागासवर्गीय आणि दिव्यांग विद्यार्थ्यांतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही सोन्याचे नाणे आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संचालन शिक्षिका मधू पराड यांनी केले. आभार प्रभारी सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे यांनी मानले.
...
आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक
प्राथमिक विभाग विभागातून मो. निसार शेख (मरणोत्तर) (सुरेंद्रगड हिंदी उच्च प्राथमिक शाळा), वीणा अनिल लोणारे (मुख्याध्यापिका तथा प्रभारी शाळा निरीक्षक), शबाना जकिउद्दीन सिद्दिकी (आझादनगर उर्दू उच्च प्राथमिक शाळा), सुनीता गुजर (पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळा नं. १), तेजुषा नाखले (संजयनगर हिंदी प्राथमिक शाळा).यांना तर माध्यमिक विभागात शकील अख्तर (प्रभारी मुख्याध्यापक, कुंदनलाल गुप्तानगर उर्दू माध्यमिक शाळा), रेश्मा खान (गरीब नवाज उर्दू माध्यमिक शाळा), राजेंद्र पुसेकर (डॉ. राममनोहर लोहिया शाळा), नीता गडेकर (विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळा).यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.