पोरवाल काॅलेजमध्ये छात्र सैनिकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:43+5:302021-08-24T04:12:43+5:30
कामठी : शहरातील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात २० एनसीसी महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर ...
कामठी : शहरातील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात २० एनसीसी महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमोल चांदना यांच्या हस्ते छात्र सैनिकांचा गाैरव करण्यात आला.
राष्ट्रीय छात्र सेना हे एकता व अनुशासनाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन अमोल चांदना यांनी केले. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा कमांडिंग ऑफिसर कर्नल अमोल चांदना यांनी पोरवाल महाविद्यालयातील छात्र सैनिक युनिटला भेट देऊन निरीक्षण केले व विविध कार्यप्रणालीची माहिती जाणून घेतली. यावेळी महाविद्यालयाच्यावतीने त्यांचाही गाैरव करण्यात आला. वरिष्ठ अंडर ऑफिसर सौरभ राहागडाले, कनिष्ठ अंडर ऑफिसर कुलदीप खरगबान, कंपनी हवालदार मेजर सुचल इंगळे, सार्जंट अभिषेक यादव, मुसेल अथर, पायल दुर्वे, चैतन्य बन्सोड, साक्षी काळे, आदित्य बावणे, रोशन तिवारी, पुष्पा चव्हाण, संकेत गजबे यांना प्रशस्तीपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. महेंद्र बागडे, छात्रसेना अधिकारी प्रा. डॉ. किशोर ढोले, उपप्राचार्य डॉ. रेणू तिवारी, डॉ. विनय चव्हाण उपस्थित हाेते. यशस्वितेसाठी सौरभ शेटे, प्रणय कांबळे, सूरज सहारे, आकांशा रामटेके, एकता गजभिये, राघव जांगडे, सुलतान हैदर अली, योगेश गोंडाणे, मंगेश यादव, विलास पजई, किशोर गरड, अरुण नायडू, सुनील राखडे यांनी सहकार्य केले.