‘मेट्रो’च्या ‘चीन कनेक्शन’चा वाद पंतप्रधान दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 08:33 PM2017-08-02T20:33:47+5:302017-08-02T20:34:29+5:30

एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे.

The Prime Minister's Court in 'Metro connection' of China connection | ‘मेट्रो’च्या ‘चीन कनेक्शन’चा वाद पंतप्रधान दरबारी

‘मेट्रो’च्या ‘चीन कनेक्शन’चा वाद पंतप्रधान दरबारी

Next

नागपूर, दि.2 - एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे. यासंदर्भात स्वदेशी जागरण मंचाने आक्रमक भुमिका घेतली असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांकडे चर्चेसाठी वेळदेखील मागण्यात आली आहे. 
सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असताना तसेच  घरांघरांमध्ये ‘चायनीज’ वस्तूंचे प्रमाण वाढत असताना याविरोधात संघ परिवारातील विविध संस्था एकत्र येऊन आवाज उंचाविणार आहेत. स्वदेशी जागरण मंचातर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहिमेत आॅगस्टमध्ये देशभरात संघ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. विदर्भात ५ ते २० ऑगस्टदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. 
मात्र दुसरीकडे संघाचे स्वयंसेवकच सत्तास्थानी असलेल्या नेत्यांनी नागपूर मेट्रोच्या ६९ डब्यांचे ८५१ कोटी रुपयांचे कंत्राट चक्क चीनच्या कंपनीला दिले आहेत. ही दुर्दैवी बाब असून आम्ही सुरुवातीपासून याचा विरोध करत आहोत. देशातच हे डबे बनू द्या, अशी विनंती आम्ही अधिकारी, मंत्र्यांना केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आता पंतप्रधानांकडेच दाद मागितली असल्याची माहिती स्वदेशी जागरण मंचच्या विचार विभागाचे अखिल भारतीय प्रमुख अजय पत्की यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली.  यावेळी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान समितीचे विदर्भ संयोजक सुभाष लोहे, उपाध्यक्ष दादाजी उके, सहसंयोजक माधव गोडसे, कर्नल (सेवानिवृत्त) अभय पटवर्धन, कॅप्टन (सेवानिवृत्त) चंद्रमोहन रणधीर, फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, विश्व संवाद केंद्राचे प्रसाद बर्वे, समीर गौतम, रविंद्र बोकारे, अतुल मोघे प्रामुख्याने उपस्थित होते. 

२ लाख घरापर्यंत पोहोचणार 
स्वदेशी जागरण मंचतर्फे राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहिमेची सुरुवात १२ जानेवारी रोजी करण्यात आली होती. विदर्भात ५ ते २० ऑगस्टमध्ये स्वदेशी पंधरवडा राबविण्यात येईल. यामाध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विविध स्वयंसेवी संघटना, व्यावसायिक संघटनांनादेखील यात समाविष्ट करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात येईल. ‘चायनिज’ वस्तूंमुळे देशासमोर निर्माण झालेले संकट, त्याचे धोके याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येईल. चीनचे वित्तीय आक्रमण परतावून लावण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यात येईल. या १५ दिवसांत नागपुरातील २ लाख घरांपर्यंत तर इतर जिल्ह्यांतील ५० हजार ते १ लाख घरांपर्यंत कार्यकर्ते प्रत्यक्ष पोहोचतील, अशी माहिती अजय पत्की यांनी दिली.

Web Title: The Prime Minister's Court in 'Metro connection' of China connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.