पंतप्रधानांचा भर जनतेच्या मनोधैर्यावर तर मुख्यमंत्र्यांचा आराखड्यावर; ‘कोरोना’काळातील अध्ययन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 08:07 PM2020-04-19T20:07:11+5:302020-04-20T18:20:52+5:30
‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता. या दोन्ही नेत्यांच्या संबोधनांच्या तुलनात्मक विश्लेषणावर अध्ययनातून ही बाब समोर आली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील प्रोफेसर डॉ. धर्मेश धवनकर यांच्या नेतृत्वात वरील अध्ययन करण्यात आले. १८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत दोन्ही नेत्यांनी केलेल्या संबोधनावर सर्वेक्षणाच्या माध्यमातून अध्ययन करण्यात आले.
अध्ययनातील निष्कर्षानुसार ‘लॉकडाऊन’संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सखोल माहिती दिली. विशेष म्हणजे, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला जनतेने जोरदार प्रतिसाद दिला. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात ‘लॉकडाऊन’चे नियोजन व राज्य सरकारची धोरणे यांची माहिती देण्यावर भर होता. या अध्ययनात निधी वैरागडे व तेजस अंजनकर यांनी सहकार्य केले.
अध्ययनातील महत्त्वाच्या बाबी
दोन्ही नेत्यांनी ‘लॉकडाऊन’च्या आर्थिक परिणामांवर प्रकाश टाकला नाही.
दोघांनीही ‘फेक न्यूज’वर बोलण्याचे टाळले
पंतप्रधानांनी प्रशासकीय बाजूपेक्षा सामाजिक कल्याणाच्या बाजूवर जास्त भर दिला.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात नागरिकांकडून विशिष्ट कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
पंतप्रधानांच्या संबोधनातील आवाहने केवळ ‘लॉकडाऊन’ किंवा संकटकाळापुरते मर्यादित नव्हते.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातून नागरिकांनी संयम पाळावा व विश्वास ठेवावा हे आवाहन.
पंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या व्यापक स्वरूपाच्या होत्या.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या नेमक्या व ठराविक आराखड्यातील होत्या.
पंतप्रधानांच्या संबोधनाच्या अध्ययनातीन निष्कर्ष
पंतप्रधानांनी प्रशासकीय बाजूपेक्षा सामाजिक कल्याणाच्या बाजूवर जास्त भर दिला. जसे की ९ कुटुंबांना २१ दिवसासाठी मदत करण्याचा संकल्प.
पंतप्रधानांच्या संबोधनातील आवाहने केवळ ‘लॉकडाऊन’ किंवा संकटकाळापुरते मर्यादित नव्हते. ‘हम स्वस्थ तो जग स्वस्थ’सारखे आवाहन
पंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या व्यापक स्वरूपाच्या होत्या.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाच्या अध्ययनातीन निष्कर्ष
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात नागरिकांकडून विशिष्ट कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातून नागरिकांनी संयम पाळावा व विश्वास ठेवावा हे आवाहन.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या नेमक्या व ठराविक आराखड्यातील होत्या.