पंतप्रधान दौऱ्याची जय्यत तयारी

By admin | Published: April 11, 2017 02:07 AM2017-04-11T02:07:57+5:302017-04-11T02:07:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र्र मोदी हे येत्या १४ एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत.

Prime Minister's tour of the world | पंतप्रधान दौऱ्याची जय्यत तयारी

पंतप्रधान दौऱ्याची जय्यत तयारी

Next

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा : आवश्यक सुविधा पूर्ण करा
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी हे येत्या १४ एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पंतप्रधानांच्या नियोजित कार्यक्रमांच्या व्यवस्थेची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. तसेच आवश्यक सुविधा तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस उपआयुक्त राजपूत तसेच महावितरण, महानिर्मिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, विविध आयोजन समितीचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
नीती आयोगातर्फे रोखरहित अर्थव्यवथेला चालना देण्यासाठी जनधन (डिजीधन) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शंभरावा मेळावा नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात पंतप्रधान यांच्या उपस्थितीत १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भीम कॅश बँक आणि रेफरल स्कीम तसेच भीमआधार यासोबतच डिजीधन व्यापार योजना तसेच मेगा ड्रॉ अंतर्गत निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान आवास योजना, एआयआयएमएस, आयआयएम व आयआयआयटी नागपूर या संस्थांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचेसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रामदास आठवले, हंसराज अहिर आदी मंत्री तसेच राज्यमंत्री मंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहे.
विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरात आयोजित या मेळाव्यात सुमारे १० ते १५ हजार नागरिक उपस्थित राहणार असल्यामुळे उन्हाळ्याच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करताना वाहतूक व्यवस्था तसेच पार्किंग आदी सुविधांची पाहणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. विभागीय क्रीडा संकुलामध्ये निमंत्रितांना बसण्याची मर्यादित व्यवस्था असल्यामुळे या परिसरात सुमारे १० ते १२ हजार नागरिक बसू शकतात तसेच त्यांना क्रीडा संकुलातील कार्यक्रम थेट पाहता येईल अशी व्यवस्था करण्याबाबत पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, तसेच जिल्हाधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १४ एप्रिल रोजीच्या दीक्षाभूमी, कोराडी थर्मलपॉवर स्टेशनचे राष्ट्रार्पण, तसेच मानकापूर येथील मुख्य कार्यक्रमाच्या संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच या कार्यक्रमासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी केल्या.(प्रतिनिधी)

Web Title: Prime Minister's tour of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.