प्रधान मुख्य वन संरक्षकपदी नितीन काकोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:43 IST2018-12-28T23:42:54+5:302018-12-28T23:43:54+5:30
अप्पर मुख्य वन संरक्षक ( अर्थ संकल्प, नियोजन व विकास) नितीन काकोडकर यांची प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) पीसीसीएफपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पीपीसीएफ ए.के. मिश्रा हे येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी काकोडकर यांची पदोन्नती करण्यात आली आहे. काकोडकर यांच्यासह ४१ वन अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदलीचे आदेश महसूल व वन विभागाने शुक्रवारी जारी केले.

प्रधान मुख्य वन संरक्षकपदी नितीन काकोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अप्पर मुख्य वन संरक्षक ( अर्थ संकल्प, नियोजन व विकास) नितीन काकोडकर यांची प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) पीसीसीएफपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पीपीसीएफ ए.के. मिश्रा हे येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी काकोडकर यांची पदोन्नती करण्यात आली आहे. काकोडकर यांच्यासह ४१ वन अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदलीचे आदेश महसूल व वन विभागाने शुक्रवारी जारी केले.
नितीन काकोडकर हे १९८७ च्या बॅचचे आयएफएस आहेत. ते सध्या वन विभागाचे अप्पर मुख्य वन संरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) म्हणून कार्यभार पाहत होते. पीसीएफ ए.के. मिश्रा हे लवकरच सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.