प्राचार्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 11:53 AM2021-07-24T11:53:32+5:302021-07-24T11:54:00+5:30
Nagpur News प्राचार्याने दारूच्या नशेत हाफपॅन्टवर शेतातील घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर त्याने परिसरातील नागरिकांना धाकदपटशा करण्याचा प्रयत्न केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : प्राचार्याने दारूच्या नशेत हाफपॅन्टवर शेतातील घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर त्याने परिसरातील नागरिकांना धाकदपटशा करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सावनेर शहरात गुरुवारी (दि. २२) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली असून, पाेलिसांनी आराेपी प्राचार्यास अटक केली.
प्राचार्य वीरेंद्र केशव जुमडे (५५, रा. आनंदम, मॉडेल मिल, गणेशपेठ, नागपूर), असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. ते सावनेर शहरातील डाॅ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. या महाविद्यालयाच्या मागे जगदीश सावजी, रा. सावनेर यांचे शेत असून, त्या शेतातील घरात १५ वर्षीय मुलगी टीव्ही बघत बसली हाेती. वीरेंद्र जुमडे दारू पिऊन तिच्या घरी गेले आणि तिचा विनयभंग केला. त्यावेळी ते हाफपॅन्टवर हाेते.
मुलीने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक गाेळा झाले. वीरेंद्र जुमडे यांनी जगदीश सावजी यांच्यासह नागरिकांना धाकदपटशा व शिवीगाळ करीत हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडितेच्या आईवडिलांनी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३५४, ५०४, पाेक्साे-२०१२ चे कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करून आराेपी वीरेंद्र जुमडे यास गुरुवारी रात्री अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनाली रासकर करीत आहेत.