प्राचार्य वानखेडेंची भररस्त्यात हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:03 AM2017-11-04T01:03:27+5:302017-11-04T01:03:39+5:30

Principal Wankhede's assassination | प्राचार्य वानखेडेंची भररस्त्यात हत्या

प्राचार्य वानखेडेंची भररस्त्यात हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देनीरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पहाटेचा थरार : कौटुंबिक कलहाशी हत्याकांडाचे जुळले तार ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चंद्रपुरात नोकरी करणाºया नागपुरातील एका प्राचार्याची शुक्रवारी पहाटे बजाजनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भीषण हत्या झाली. मारेकºयांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला धडक मारली आणि नंतर त्यांचा गळा धारदार शस्त्राने कापला. या थरारक हत्याकांडामुळे उपराजधानीत खळबळ उडाली आहे. मोरेश्वर महादेवराव वानखेडे (वय ५७) असे मृत प्राचार्यांचे नाव आहे. ते चंद्र्रपूर (तुकूम) मधील खत्री महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवारत होते.

नागपुरातून ते येणे-जाणे करीत होते. भल्या सकाळी ते दुचाकीने रेल्वेस्थानकावर जायचे आणि तेथून ते रेल्वेने चंद्रपूरला जायचे. रात्री ७.३० च्या सुमारास ते परत येत होते. नरेंद्रनगरातील म्हाडा कॉलनीत प्रा. वानखेडे राहायचे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे ४ वाजता ते घरून दुचाकीने रेल्वेस्थानकाकडे निघाले. छत्रपती चौकातून ते नीरीमार्गे रेल्वेस्थानकाकडे जात होते. ४.४५ वाजता नीरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या दुचाकीला हल्लेखोरांनी धडक मारली. हल्लेखोरांनी त्यांना कसलीही संधी न देता धारदार शस्त्राने त्यांचा गळा कापून पळ काढला. एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने मॉर्निंग वॉक करणाºयांनी नियंत्रण कक्षाला कळविले. त्या माहितीवरून प्रारंभी धंतोली आणि नंतर बजाजनगर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी वानखेडे यांना बघितले असता ते मृतावस्थेत आढळले. मारेकºयांनी त्यांचा गळा कापला होता. पोलिसांनी त्यांना मेडिकलमध्ये नेले. त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरी कळवले. एका प्राचार्याची हत्या झाल्याचे वृत्त पसरल्याने उपराजधानीत खळबळ उडाली.
सुपारी दिल्याचा संशय
एवढ्या पहाटे प्रा. वानखेडे यांची हत्या कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली असावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बजाजनगर आणि गुन्हे शाखेचे पोलीस त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शुक्रवारी दिवसभर प्रयत्नरत होते. पोलिसांच्या दिवसभराच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. प्रा. वानखेडे यांची पत्नी अनिता यादेखील प्राध्यापक आहेत. त्यांना शामली नामक विवाहित मुलगी असून, तिला चार वर्षांची मुलगी आहे. पतीशी मतभेद झाल्यामुळे ती वडिलांकडे राहत आहे. दुसरा मुलगा तन्मय बारावीचा विद्यार्थी आहे. कौटुंबिक कलहाचा पैलूही या हत्याकांडाशी जुळला असून, पोलिसांकडे अनेक दुवे उपलब्ध आहेत. सुपारी देऊन ही हत्या केल्याचा संशयही व्यक्त होत आहे. काही तासातच आरोपी अटक करू, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्तवित आहेत.

Web Title: Principal Wankhede's assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.