अर्थसंकल्पात प्रलंबित योजनांना प्राधान्य

By admin | Published: March 24, 2016 02:38 AM2016-03-24T02:38:41+5:302016-03-24T02:38:41+5:30

महापालिकेच्या २०१६-१७ या वर्षाच्या अर्थसंकल्पात नवीन मोठ्या योजनांचा समावेश न करता मागील चार वर्षातील

Prioritization of pending schemes in the budget | अर्थसंकल्पात प्रलंबित योजनांना प्राधान्य

अर्थसंकल्पात प्रलंबित योजनांना प्राधान्य

Next

नागपूर : महापालिकेच्या २०१६-१७ या वर्षाच्या अर्थसंकल्पात नवीन मोठ्या योजनांचा समावेश न करता मागील चार वर्षातील प्रलंबित प्रकल्प व योजना पूर्ण करण्याला प्राधान्य देऊ न आश्वासन पूर्तीकडे वाटचाल राहणार आहे. पुढील वर्षात निवडणूक असल्याने कोणत्याही स्वरूपाची करवाढ न करता नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील.
रविवारी २७ मार्चला महापालिकेच्या विशेष सभेत स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. ३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात राज्य सरकार, नासुप्र व महापालिका यांचा प्रत्येकी १०० कोटींचा वाटा आहे. पुढील वर्षातही ३०० कोटींचे सिमेंट रस्ते निर्माण केले जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सिमेंट रस्त्यांसाठी ४० कोटींचीच तरतूद करण्यात आली होती. परंतु एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने हा निधी उपलब्ध करता आला नाही.
महापालिका क्षेत्रात वाढ करण्यात आल्याने नव्याने जोडण्यात आलेल्या हुडकेश्वर व नरसाळा भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. या भागातील विकास कामांसाठी तरतूद करावी लागणार आहे.शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलांचा प्रश्न मागील काही वर्षांपासून रखडलेला आहे. गेल्यावर्षी अजनी रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु या पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यासाठी तरतूद अपेक्षित आहे. मनीषनगर येथील प्रस्तावित उड्डाणपूल, पूर्व नागपुरात प्रस्तावित कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, कचऱ्यापासून वीज निर्मिती, सांडपाण्यावर प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन असे मोठे प्रकल्प प्रस्तावित आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक असल्याने त्यापूर्वी या कामांना सुरुवात करून विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न नागपूर विकास आघाडीचा आहे. यासाठी तरतूद अपेक्षित आहे.
महापालिकेचे उत्पन्न १००० ते ११०० कोटींच्या आसपास आहे. परंतु अर्थसंकल्प २००० हजार कोटीहून अधिक रकमेचा असल्याने मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान गृहीत आहे. यात एलबीटीच्या मोबदल्यात ५५० ते ६०० कोटी, तसेच सिमेंट रस्ते व अमृत योजनेंतर्गत अपेक्षित अनुदानाचा समावेश राहणार आहे. (प्रतिनिधी)

घोषणांची अंमलबजावणी नाही
४ गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात आदर्श वस्ती सुधार योजना, परिसर पालकत्व योजना, मोबाईल टायबस, खाऊ गल्ली, शहर वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, उत्तर व दक्षिण सिवरेज झोन, महिलासाठी सुलभ शौचालये, महिला स्वयंरोजगार योजना, स्लम भागातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप, तलावांची स्वच्छता व विकास, बाजार व संकुल निर्माण, आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, वाठोडा येथे क्रीडा संकुलाची निर्मिती, अंबाझरी उद्यानाचा विकास आदी योजनांची घोषणा करण्यात आली होती. परंतु यातील बहुसंग्य योजनांना अद्याप सुरुवात झालेली नाही.

Web Title: Prioritization of pending schemes in the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.