कैद्यांनाही आता विमा सुरक्षा कवच
By admin | Published: June 20, 2015 02:54 AM2015-06-20T02:54:48+5:302015-06-20T02:54:48+5:30
कारागृहात खितपत पडलेल्या कैद्यांनाही आता विमा सुरक्षा कवच मिळणार आहे.
नरेश डोंगरे नागपूर
कारागृहात खितपत पडलेल्या कैद्यांनाही आता विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या पुढाकाराने येथे प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना सुरू होत असून, रविवारी २१ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. कैद्याच्या पश्चात त्यांच्या नातेवाईकांना विम्याच्या रकमेचा लाभ मिळणार असल्याने सिद्धदोष कैद्यांमध्ये या अनुषंगाने चांगली प्रतिक्रिया उमटली आहे.
समाजाचा हिस्सा असूनही समाजापासून दुरावलेला घटक म्हणजे कारागृहातील बंदिवान (कैदी). कोर्टाने एकदा शिक्षा सुनावली की हे कैदी त्यांच्या परिवारापासूनच नव्हे तर समाजापासूनही दूर सारले जातात. घृणा, द्वेष, तिरस्कार त्यांच्या वाट्याला येतो. त्याचमुळे काही एकलकोंडे तर काही कैदी अधिक क्रूर बनतात. दुसरीकडे ते जगले काय आणि मेले काय, त्याची पर्वा नातेवाईकांचा अपवाद वगळता इतरांना नसते.