खुल्या कारागृहातील कैदी पळाला

By admin | Published: February 27, 2017 11:46 PM2017-02-27T23:46:19+5:302017-02-27T23:46:19+5:30

खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक बंदिवान (कैदी) येथील मध्यवर्ती (खुल्या) कारागृहाच्या शेतातून पळून गेला. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडलेल्या

Prisoners in open jails escaped | खुल्या कारागृहातील कैदी पळाला

खुल्या कारागृहातील कैदी पळाला

Next
>नागपूर : खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक बंदिवान (कैदी) येथील मध्यवर्ती (खुल्या) कारागृहाच्या शेतातून पळून गेला. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून, त्याला शोधण्यासाठी पोलिसांची विविध पथके कामी लागली आहे. 
 शामल दिनेश बिस्वास (वय ४१) असे पळून गेलेल्या बंदिवानाचे नाव आहे. मूळचा पश्चिम बंगालमधील पुरंदा-बेखाडी,  उत्तर (२४) परगणा जिल्ह्यातील रहिवासी असलेला शामल १२ वर्षांपूर्वी मुंबईत राहत होता. आॅगस्ट २००५ मध्ये त्याल्ली मेहुणीची हत्या केल्यामुळे त्याला सायन पोलिसांनी अटक केली होती.  १७ मार्च २००७ ला शिवडीच्या सत्र न्यायालयाने त्याला खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काही दिवस मुंबई कारागृहात आणि नंतर त्याला कोल्हापूरच्या कारागृहात ठेवण्यात आले. ३१ जानेवारी २०१६ ला त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. येथे त्याचे वर्तन चांगले असल्यामुळे त्याला खुल्या कारागृहात पाठविण्यात आले. नेहमीप्रमाणे  सोमवारी सकाळी ८.३० वाजता इतर  ११ कैद्यांसोबत कारागृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर आला आणि शेतात काम करू लागला. दुपारी १२ च्या सुमारास शेतातच  जेवण घेतल्यानंतर तो दिसेनासा झाला. प्रारंभी कैद्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, अर्धा तास होऊनही शामल दिसत नसल्याने त्याच्या सोबतच्या कैद्यांनी तुरुंगाधिकाºयांकडे तक्रार केली. त्यानंतर शामलची शोधाशोध सुरू झाली. तो  पळून गेल्याचे लक्षात आल्यामुळे कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी धंतोली ठाण्यात माहिती कळविली. पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी करून बसस्थानक, रेल्वेस्थानकासह ठिकठिकाणी शामलचा शोध घेणे सुरू केले. मात्र, रात्रीपर्यंत शामलचा शोध लागला नव्हता.  
तिकडे कारागृह प्रशासनात शामल पळून गेल्याने प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई सध्या नागपूरबाहेर आहेत. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, शामलच्या पळून जाण्याला कुणाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, त्याची चौकशी केली जात आहे.  
 
खुल्या कारागृहातील तिसरा कैदी 
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच असलेल्या खुल्या कारागृहातून गेल्या दोन वर्षात पळून गेलेला शामल हा तिसरा कैदी ठरला. दोन वर्षांपूर्वी अरखेल नामक कैदी प्रेयसीसोबत पळून गेला होता. तीन दिवसानंतर तो अकोला येथे सापडला होता. त्यानंतर असाच एक कैदी गेल्यावर्षी खुल्या कारागृहातून पळून गेला होता.

Web Title: Prisoners in open jails escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.