खासगी वाहनचालक पुन्हा आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:10+5:302021-03-16T04:10:10+5:30

संजय गणाेरकर लाेकमत न्यूज नेटवर्क माेहपा : काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात काेराेना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. त्यामुळे मध्यंतरी ...

Private drivers in financial crisis again | खासगी वाहनचालक पुन्हा आर्थिक संकटात

खासगी वाहनचालक पुन्हा आर्थिक संकटात

Next

संजय गणाेरकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेहपा : काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात काेराेना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. त्यामुळे मध्यंतरी पूर्वपदावर येत असलेली स्थिती ’जैसे थे’च हाेण्याची चिन्हे दिसून लागली आहे. वाढत्या संक्रमणामुळे सामाजिक व काैटुंबिक कार्यक्रमांना ‘ब्रेक’ लागल्याने खासगी वाहनचालकांसह स्कूलबस चालकही आर्थिक संकटात सापडले आहेत.

अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांचा फिरायला किंवा पर्यटन अथवा देवदर्शनाला जाण्याचा कल कमी झाला आहे. साेबतच लग्न जुळवणी, साखरपुडा, साक्षगंध, वाढदिवस, लग्नसमारंभ या छोटे-मोठे कार्यक्रमही निवडक नातेवाइकांच्या उपस्थितीत पार पडणे सुरू झाले. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांची गरज कमी झाल्याने त्यांना भाडे मिळणेही कठीण झाले. याचा विपरित परिणाम त्या वाहनांच्या चालकांच्या अर्थकारणावर झाला.

मागील वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली हाेती. संपूर्ण उन्हाळाभर काेणत्याही सामाजिक कार्यक्रमांचे माेठ्या प्रमाणात आयाेजन करण्यात आले नाही. त्यामुळे या कार्यक्रमांना पूरक असलेले छाेटे व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांचे राेजगार हिरावले गेले. त्यातच प्रवासी वाहतुकीला प्रशासनाची परवानगी व पास अनिवार्य केली हाेती. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने उभी आहेत. परिणामी, खासगी वाहनांवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेकडाे नागरिकांच्या कुटुंबांना आर्थिक संकटांना ताेंड द्यावे लागत आहे.

...

कर्जाच्या हप्त्याची समस्या

अनेकांना राेजगाराची प्रवासी व मालवाहू वाहनांची खरेदी केली. त्यासाठी त्यांनी बॅंका व इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले. ही वाहने उभी असल्याने कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाल्याने काहींनी ती वाहने कमी किमतीत विकून भाजीपाला, फळे विक्रीचा व इतर व्यवसाय सुरू केला. शाळा, महाविद्यालयेदेखील वर्षभरापासून बंद असल्याने स्कूलबस व विद्यार्थ्यांना ने-आण करणारी इतर वाहनेही उभी आहेत. ज्यांच्याकडे वाहने आहेत, त्यांना भाडे मिळत नसल्याने वाहनमालकांसह चालक हवालदिल झाले आहेत.

...

वाहने विकण्याकडे कल

प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा वर्षभरापासून बंद आहेत. याही वर्षी तीच परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे वाहन विकण्याचा विचार करीत असल्याचे माेहपा (ता. कळमेश्वर) येथील स्कूलबसचालक मतीन कुरेशी यांनी सांगितले. एकीकडे या वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढत असून, भाडे नसल्याचे त्यांनी सांगितले. काेराेना संक्रमणामुळे छाेटे-माेठे लग्न व इतर सामाजिक कार्यक्रमही बंद आहेत. त्यामुळे भाडे मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते थकीत आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आहे, अशी प्रतिक्रिया खुमारी (ता. कळमेश्वर) येथील खासगी वाहनचालक स्वप्नील निंबूळकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Private drivers in financial crisis again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.