सर्दी-तापाच्या रुग्णांना खासगी रुग्णालये करताहेत दूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:02 AM2020-04-22T00:02:24+5:302020-04-22T00:03:50+5:30

पूर्वी सर्दी, ताप व खोकल्याचे लक्षण दिसल्यास रुग्ण शहरातील कुठल्याही दवाखान्यात जाऊन उपचार घेत होता; मात्र कोरोनाचे संक्रमण पसरल्यानंतर सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयाने नाकारले आहे.

Private hospitals are treating cold and fever patients far away! | सर्दी-तापाच्या रुग्णांना खासगी रुग्णालये करताहेत दूर!

सर्दी-तापाच्या रुग्णांना खासगी रुग्णालये करताहेत दूर!

Next
ठळक मुद्देमोठ्या खासगी रुग्णालयात रुग्णांची करताहेत पहिले स्क्रीनिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्वी सर्दी, ताप व खोकल्याचे लक्षण दिसल्यास रुग्ण शहरातील कुठल्याही दवाखान्यात जाऊन उपचार घेत होता; मात्र कोरोनाचे संक्रमण पसरल्यानंतर सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयाने नाकारले आहे. त्यामुळे ही लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. तर रुग्णसुद्धा भीतीपोटी रुग्णालयात जाण्यापासून कचरत आहेत.
खासगी रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे की, कोरोनाच्या संदर्भात दिशानिर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्याचे पालन केले जात आहे. शहरातील तीन सरकारी रुग्णालयात कोरोनाची टेस्ट केली जात आहे. अशात खासगी रुग्णालयात उपचार करण्यापेक्षा त्याला योग्य ठिकाणी रेफर केले जात आहे. सध्या खासगी रुग्णालयाच्या ओपीडीत रुग्णांची संख्या केवळ १० ते १५ टक्के आहे. काही छोट्या डिस्पेंसरीजमध्ये डॉक्टर आपल्या स्तरावर रुग्णांची तपासणी करीत आहेत. सर्दी व तापासाठी औषध देत आहेत. तीन ते पाच दिवसात रुग्ण ठीक न झाल्यास त्याला सरकारी रुग्णालयात रेफर केले जात आहे.

व्हिडिओ कॉन्फरनिसंगद्वारे दिला जातो सल्ला
वोक्हार्ट रुग्णालयाच्या सेंटर हेड के. सुजाता यांनी सांगितले, कोरोनाच्या संदर्भात राज्य सरकारचे दिशानिर्देश जारी झाले आहेत. त्याचे अनुकरण रुग्णालय करीत आहे. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णालायातील ओपीडी १० टक्क्यांवर आली आहे. वोक्हार्टने ऑनलाईन ओपीडी सुरू केली आहे. यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतली जात आहे. कुठला रुग्ण जर रुग्णालयात येत असेल तर त्याची स्क्रीनिंग केली जात आहे. कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याला मेडिकल अथवा मेयोत रेफर केले जात आहे.

कोरोनाचे लक्षण दिसल्यास रेफर करतो
एलिक्सिस हॉस्पिटलचे सिनियर हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर डॉ. तुषार गवाड म्हणाले रुग्णालयाची ओपीडी नियमित सुरू आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी येथे येणाऱ्या रुग्णाचे पहिले स्क्रीनिंग केले जाते. एक्स-रे सुद्धा काढले जात आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्यांना मेडिकल व मेयोमध्ये रेफर केले जात आहे. कोरोनाच्या तपासणीची सुविधा खासगी रुग्णालयाला देण्यात आली नाही. ओपीडीमध्ये येणाºया रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री सुद्धा घेतली जात आहे.

ओपीडी सुरू पण रुग्ण कमी
केअर रुग्णालयाचे रवी मामीडवार म्हणाले रुग्णालयातील ओपीडी सुरू आहे. मात्र रुग्णांची संख्या १० टक्क्यावर आली आहे. येथे येणाऱ्या रुग्णाची पहिले स्क्रीनिंग केली जाते. रुग्णालयात पीपीई किट घालूनच रुग्णांची तपासणी केली जाते. शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे. जर कुठल्या रुग्णात कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याला मेडिकल व मेयोमध्ये रेफर केले जाते.

Web Title: Private hospitals are treating cold and fever patients far away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.