कोविड १९ आयसोलेशन युनिट्ससाठी नागपुरातील खाजगी हॉस्पिटल्स तयार नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 07:00 AM2020-04-30T07:00:00+5:302020-04-30T07:00:07+5:30
कोरोना विषाणूने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत सरकारने खाजगी इस्पितळांना सज्ज राहण्याचे आवाहन केले असून, आयसोलेशन युनिट्स तयार ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र, अन्यान्न कारणाने आयसोलेशन युनिट तयार करण्यासाठी खाजगी इस्पितळे असहाय असल्याचे दिसून येत आहे.
मेहा शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत सरकारने खाजगी इस्पितळांना सज्ज राहण्याचे आवाहन केले असून, आयसोलेशन युनिट्स तयार ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र, अन्यान्न कारणाने आयसोलेशन युनिट तयार करण्यासाठी खाजगी इस्पितळे असहाय असल्याचे दिसून येत आहे.
सरकारची मदत करण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. मात्र, आयसोलेशन युनिटसाठी वेगळी जागा आमच्याकडे नसल्याचे कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. उदय माहूरकर यांनी सांगितले. अनेक खाजगी इस्पितळे छोटे असून, रहिवासी भागात असल्याने त्या भागात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका असल्याची भिती डॉ. जय देशमुख यांनी व्यक्त केली. शिवाय, लहान इस्पितळांकडे आवश्यक असे उपकरणेही नसल्याचे ते म्हणाले. तरीदेखील ५० टक्के स्टाफ क्षमतेसोबत काम करण्यास तयार असल्याचे देशमुख म्हणाले. स्पंदन हार्ट इन्स्टिट्यूशनचे संचालक डॉ. हर्षवर्धन मार्डिकर यांनीही याबाबत मत व्यक्त केले. वेंटिलेटरची सुविधा असलेले कोणतेही इस्पितळ कोरोना संक्रमित रुग्णांसाठी आपत्कालिन युनिट म्हणून काम करू शकते. परंतु, यावेळी २० टक्के रुग्णांकरिता वेंटिलेटरची गरज आहे. नागपुरातील खाजगी इस्पितळांकडे आयसोलेशन युनिट्स नाहीत. मात्र, त्यांच्याकडे पुरेसा वेळ असल्याने ही सुविधा उपलब्ध करता येऊ शकते. तरीदेखील सरकारने लंडनच्या एक्सेल सेंटरच्या धर्तीवर स्वत:ची अशी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे मार्डिकर म्हणाले. आॅरेंजसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनूप मरार यांनी आमचे हॉस्पिटल या स्थितीशी सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगितले. मात्र, नागपुरातील जवळपास सर्वच हॉस्पिटल्स आयसोलेशन नियमानुसार बनलेले नाही, असे ते म्हणाले. यावरून नागपुरात सध्या वैद्यकीय व्यवस्था प्रत्येक स्तरात कमजोर असल्याचे सिद्ध होते.
आर्थिकदृष्ट्या कठीण - अशोक अर्बट
डॉ. अशोक अर्बट यांनी डब्ल्यूएचओ व आयसीएमआरने कोरोनासंदर्भात सगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने संशयित व पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वेगळे प्रवेशद्वार असणे गरजेचे आहे. डॉक्टर व स्टॉफलाही नियमानुसार राहावे लागेल. पीपीई व एन-९५ मास्क सर्वांसाठीच असणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या बघितले तर हे काम कठीण आहे. एका मास्कची किंमत हजार ते १२०० रुपये एवढी आहे. शिवाय अन्य सुविधाही उपलब्ध कराव्या लागणार असल्याचे अर्बट यांनी सांगितले.
वेगळे इस्पितळ बनविण्याची गरज!
डॉ. श्रीकांत मुकेवार यांच्या मनानुसार अशा स्थितीत वुहान मॉडेल किंवा इटली मॉडेल आत्मसात करण्याची गरज आहे. या दोन्ही देशांमध्ये कोरोनाचे झपाट्याने होत असलेले संक्रमण बघता वेगळे इस्पितळे बनविण्यात आली आहे. डॉ. राजू खंडेलवार यांनी खाजगी वैद्यकीय सेवेला सरकार कधीही मदत मागू शकते, तो सरकारचा अधिकारच आहे. मात्र, समस्या मोठ्या आहेत. अनेक हॉस्पिटल्स नागरिक क्षेत्रात आहेत. तेथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वच परिसर क्वॉरंटाईन करावे लागेल. शिवाय, पीपीई कीट व मास्क उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत खाजगी इस्पितळे अशा सुविधा कशा उपलब्ध करतील, हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने सर्वच हॉस्पिटल्स आपल्या अधिकारात घेणे गरजेचे असल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले.