तिसऱ्या लाटेसाठी खासगी वैद्यकीय यंत्रणेनेही तयार राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:54+5:302021-09-27T04:09:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरमध्ये दुसऱ्या लाटेदरम्यान शासकीय यंत्रणेसोबतच खासगी यंत्रणेनेही अतिशय जबाबदारीने काम केले आहे. याची प्रशासनाने ...

Private medical systems should also be prepared for the third wave | तिसऱ्या लाटेसाठी खासगी वैद्यकीय यंत्रणेनेही तयार राहावे

तिसऱ्या लाटेसाठी खासगी वैद्यकीय यंत्रणेनेही तयार राहावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरमध्ये दुसऱ्या लाटेदरम्यान शासकीय यंत्रणेसोबतच खासगी यंत्रणेनेही अतिशय जबाबदारीने काम केले आहे. याची प्रशासनाने नोंद घेतली असून, तिसऱ्या लाटेमध्येही नागपूर शहरातील खासगी हॉस्पिटल यांची मदत प्रशासनाला लागेल. त्या दृष्टीने तयारीला लागा, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी रविवारी येथे केले.

जागतिक हृदय दिन २९ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने नागपुरातील स्वास्थ्यम् हॉस्पिटलमध्ये हार्टविषयक जनजागृती कार्यक्रम गेल्या सात दिवसांपासून सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या नॉलेज गॅलरीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. ‘कार्डियाक रिहॅब सेंटर’चे उद्घाटनही करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक डॉ. पंकज हरकुट, डॉ. सोहल पराते, डॉ. रोहित कुमार गुप्ता, डॉ. पूनम हरकुट, डॉ. प्रीती गुप्ता, डॉ. विजय हरकुट यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर हे मध्य भारतातील आरोग्यदृष्ट्या उत्तम सुविधा केंद्र होत असून, याचा लाभ मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा या राज्यांना होत आहे. भौगोलिकदृष्ट्या तेथील नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी सोयीचे व लाभदायक ठरणार आहे. त्यासाठी आपली यंत्रणा अद्यावत ठेवावी. सोबतच सामाजिक बांधिलकीतून रुग्णांची शुश्रूषा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Private medical systems should also be prepared for the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.