नागपूर विमानतळाचे अखेर खासगीकरण
By admin | Published: October 7, 2016 02:54 AM2016-10-07T02:54:36+5:302016-10-07T02:54:36+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणासाठी ६ आॅक्टोबरला काढण्यात आलेल्या जागतिक निविदेत मिहान इंडिया लिमिटेडला
निविदेत सहा कंपन्यांचा सहभाग : १४२० कोटींची गुंतवणूक
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणासाठी ६ आॅक्टोबरला काढण्यात आलेल्या जागतिक निविदेत मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत.
भविष्यात विमानतळ फायद्याचा
एस्सेल इन्फ्रा, जीव्हीके, जीएमआर, आयआरबी, पीएनबी आणि टाटा कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. कंपनीचे नियम आणि अटीनुसार कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. यात पात्र ठरलेल्या कंपनीला आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर मसुद्यानुसार वित्तीय निविदेत कंपनीभाग घेता येईल. नवीन मुंबईसाठी चार आणि गोवा येथील विमानतळासाठी पाच निविदा आल्या तर नागपूरसाठी सहा कंपन्यांनी भाग घेतला, हे विशेष. भविष्यात हे विमानतळ फायद्याचे असल्यामुळे नामांकित कंपन्यांचे लक्ष वेधले आहे.
नवीन धावपट्टी व टर्मिनल इमारत
गुरुवारी दुपारी ३ वाजेपासून सायंकाळपर्यंत गुंतवणूकदार कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. खासगीकरणात १४२० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामध्ये नवीन टर्मिनल इमारत आणि दुसऱ्या धावपट्टीचा समावेश आहे.