नागपूर विमानतळाचे खासगीकरण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:35 AM2018-05-25T00:35:50+5:302018-05-25T00:35:50+5:30

राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे(एमएडीसी)संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. आता स्पर्धेतील पाच कंपन्या १४ जूनपर्यंत वित्तीय निविदा भरणार आहेत. शिवाय १४ आॅगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. या सर्व तारखा निविदेत नमूद असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Privateization of Nagpur Airport will be soon | नागपूर विमानतळाचे खासगीकरण लवकरच

नागपूर विमानतळाचे खासगीकरण लवकरच

Next
ठळक मुद्देपाच कंपन्या स्पर्धेत : १४ जूनपर्यंत वित्तीय निविदा भरणार







लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे(एमएडीसी)संचालन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. आता स्पर्धेतील पाच कंपन्या १४ जूनपर्यंत वित्तीय निविदा भरणार आहेत. शिवाय १४ आॅगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. या सर्व तारखा निविदेत नमूद असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मिहान प्रकल्पात विमानतळ विकासाचा समावेश आहे. आघाडी सरकारच्या काळात पाच वर्षे निविदा रखडली. २०१६ च्या प्रारंभी निविदा निघाली. स्पर्धेत १२ कंपन्या होत्या. त्यातील टाटा रिअ‍ॅलिटी, जीएमआर इन्फ्रा, जीव्हीके, पीएनसी इन्फ्राटेक व एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्या पात्र ठरल्या. पण त्यानंतर प्रक्रियेची गती संथ आहे.
निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या पाच कंपन्यांना देण्यात येणारा प्रारूप सवलत करारनामा(ड्राफ्ट कन्सेशन अ‍ॅग्रीमेंट)आणि महसूल प्रस्तावाला(आरएफपी)राज्याच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली. खासगीकरणात ७४ टक्के समभाग कंपनीकडे जातील आणि राज्य व केंद्राची भागीदारी १३-१३ टक्क्यांवर येणार आहे.
कंत्राट मिळालेल्या कंपनीला १९८२ कोटी रुपये खर्चून नवीन विमानतळ उभे करायचे आहे. पहिल्या टप्प्यात १४२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत दोन समांतर धावपट्ट्या कार्गो आणि टर्मिनल इमारत तसेच विविध एमआरओंचा समावेश आहे. पुढील तीन टप्पे ५४० कोटी रुपयांचे आहेत. विमानतळ खासगीकरणाचा राज्य शासनाचा पहिलाच प्रकल्प आहे. प्रक्रियेत कुठल्याही अडचणी येऊ नयेत, याची काळजी शासन घेत असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

Web Title: Privateization of Nagpur Airport will be soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.