कॅपिटल हाईट्सला सेव्हन स्टार क्रिसील रेटींगचा बहुमान
By admin | Published: September 25, 2015 03:50 AM2015-09-25T03:50:16+5:302015-09-25T03:50:16+5:30
टाटा सन्स लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या समूहाच्या टाटा रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या नागपुरातील कॅपिटल हाईट्स ...
नागपुरातील पहिला प्रकल्प : ट्रिलियम मॉल तयार करण्याची घोषणा
नागपूर : टाटा सन्स लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या समूहाच्या टाटा रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या नागपुरातील कॅपिटल हाईट्स या प्रकल्पाला प्रतिष्ठेचा सेव्हन स्टार क्रिसील रेटींगचा बहुमान मिळाला आहे, अशी माहिती टाटा रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे रिअल इस्टेटचे प्रमुख अभिजित माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टाटा रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या विकासात्मक वाटचालीबाबत बोलताना अभिजित माहेश्वरी म्हणाले, प्रीमिअम रेसिडेन्सीयल अपार्टमेंटला सेव्हनस्टार रेटींग मिळणारा कॅपिटल हाईट्स हा नागपुरातील एकमेव प्रकल्प आहे. प्रकल्पात रहिवाशांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात क्लब हाऊस, मल्टीप्लेक्स, फूड कोर्ट, सर्व वयोगटासाठी डायनिंगची व्यवस्था, इन डोअर गेम्स, चिल्ड्रेन अँड सिनिअर सिटीझन्स एरिया, योगा कोर्ट, अॅम्पीथिएटर, जिम्नॅशियम, स्क्वॉश कोर्ट, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रेन प्ले एरिया, सायकलिंग ट्रॅक आदींची सुविधा राहणार आहे. कॅपिटल हाईट्स रेसिडेन्सेस ही एक ग्रीन बिल्डींग असून यात जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशनची सुविधा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कॅपिटल हाईट्स या प्रीमिअम रेसिडेन्सेसनंतर आता ट्रिलियम मॉल उभारण्यात येणार आहे. हा मॉल ४ लाख चौरसफूटांच्या भव्य जागेत साकारण्यात येईल. आगामी दोन वर्षात हा मॉल तयार होणार आहे. मॉलमध्ये शॉपिंग, मनोरंजन आणि डायनिंगची प्रशस्त व्यवस्था राहणार आहे. सर्व मॉल वातानुकूलित राहणार आहे. मॉलचे डिझाईन आर. के. असोसिएट या आर्किटेक्चरल फर्मने तयार केले आहे.
शहराच्या मध्यभागी असल्यामुळे नागरिकांना हा मॉल अतिशय सोयीचा ठरणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय टाटा रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडतर्फे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीनुसार सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे माहेश्वरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विपणन प्रमुख सौरभ जैन आणि कर्मचारी उपस्थित होते.
(वा. प्र.)