नक्षल्यांच्या गुहेत प्रियंका गांधींची होणार एन्ट्री; सुरक्षा यंत्रणेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 07:00 AM2021-12-10T07:00:00+5:302021-12-10T07:00:16+5:30

Nagpur News नक्षल्यांची गुहा समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. नक्षल चळवळीचा रोष धुमसत असताना हा दाैरा आयोजित करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेची धावपळ वाढली आहे.

Priyanka Gandhi to enter Naxal cave; Security system on alert mode | नक्षल्यांच्या गुहेत प्रियंका गांधींची होणार एन्ट्री; सुरक्षा यंत्रणेची धावपळ

नक्षल्यांच्या गुहेत प्रियंका गांधींची होणार एन्ट्री; सुरक्षा यंत्रणेची धावपळ

Next
ठळक मुद्दे सीआरपीएफचे राहणार क्लोज प्रोटेक्शननक्षल वॉचरसह सारेच सज्ज

 

नरेश डोंगरे 

नागपूर - नक्षल्यांची गुहा समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. नक्षलवाद्यांचा दंडकारण्यातील शीर्षस्थ नेता नुकताच मारला गेल्यामुळे नक्षल चळवळीचा रोष धुमसत असताना प्रियंका गांधी यांचा हा दाैरा आयोजित करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेची धावपळ वाढली आहे.

गडचिरोली गोंदियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नक्षल चळवळीचे अस्तित्व जिवंत राखण्याचा भरसक प्रयत्न मिलिंद तेलतुंबडे करीत होता. अलीकडे त्याने महाराष्ट्रातील नक्षल चळवळ आक्रमक करण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांची नवीन (संयुक्त) झोन कमिटी तयार केली होती. तो मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत असतानाच १३ नोव्हेंबरला भल्या सकाळी गडचिरोली पोलिसांनी मिलिंदसह २७ नक्षल्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे महाराष्ट्रासह आजूबाजूंच्या चार प्रांतांतील नक्षल चळवळीलाही जबरदस्त हादरा बसला आहे. या घटनेचा बदला घेण्याची धमकीही नक्षल्यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर ते संधीच्या शोधात असल्याचेही वृत्त गुप्तचरांकडे आले आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी १४ डिसेंबरला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गडचिरोलीत येत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ वाढली आहे. शीर्षस्थ अधिकाऱ्यांकडून दाैऱ्याची सुरक्षा अन् उपाययोजनांच्या संबंधाने नियोजन कसे राहील, त्यावर विचारमंथन केले जात आहे. घातपात, गोंधळाची कुणालाही संधी मिळणार नाही, या संबंधाने अत्याधिक खबरदारी घेतली जाणार आहे. कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात नक्षल वॉचर राहणार असून, स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त आजूबाजूचेही अतिरिक्त सुरक्षाबळ मागवून घेतले जाणार आहे. या संबंधाने रेंजमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.

चार स्तरीय सुरक्षा कवच

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंका यांना गडचिरोली दाैऱ्यादरम्यान सुरक्षेचे चार स्तरीय कवच राहणार आहे. त्यांना सीआरपीएफचे क्लोज प्रोटेक्शन राहणार आहे. त्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन, नंतर गडचिरोलीतील निष्णात कमांडो आणि त्यानंतर स्थानिक पोलीस अशी ही सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. या संबंधाने अधिक माहितीसाठी गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

----

Web Title: Priyanka Gandhi to enter Naxal cave; Security system on alert mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.