प्रेयसीची तक्र ार : प्रियकर गजाआड

By Admin | Published: July 3, 2017 02:50 PM2017-07-03T14:50:29+5:302017-07-03T14:50:29+5:30

लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर वर्षभरापासून अनेकदा शरीरसंबंध जोडणा-या प्रियकराने आता चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले.

Priya's Complaint: Lover Ghazaad | प्रेयसीची तक्र ार : प्रियकर गजाआड

प्रेयसीची तक्र ार : प्रियकर गजाआड

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत
नागपूर : लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर वर्षभरापासून अनेकदा शरीरसंबंध जोडणा-या प्रियकराने आता चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले. त्याच्या वर्तणूकीत बदल झाल्यामुळे प्रेयसीने त्याच्यावर बलात्कारासोबतच फसवणुकीचाही आरोप लावला. परिणामी प्रियकराला लग्नाऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकावे लागले. फेसबुकवरून सुरू झालेल्या मैत्री आणि प्रेमाचा शेवट सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला.
आशिष गोपाळराव दहेलकर (वय २३) हा सक्करदऱ्यातील खानखोजेनगरात राहतो. तो बीए द्वितिय वर्षाला शिकतो. विज्ञान शाखेची विद्यार्थीनी असलेल्या तरुणीसोबत त्याची वर्षभरापूर्वी फेसबुकवरून ओळख झाली. हे दोघे अनेक दिवस आॅनलाईन संपर्कात होते. नंतर त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी वाढल्या. मैत्रीचे रु पांतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर ३० एप्रिल २०१६ ला या दोघांनी भाड्याच्या खोलीत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्यांच्यात नियमित शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले. वर्षभरापासून सुरू असलेल्या या मधुर संबंधाला गेल्या काही दिवसांपासून वादाची जोड मिळाली. आशिष तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढले. ते टोकाला गेले. आशिष लग्न करणार नाही, याची कल्पना आल्यामुळे प्रेयसीने सक्करदरा ठाण्यात तक्र ार नोंदवली. सहायक पोलीस निरीक्षक ताकसांडे यांनी या प्रकरणी बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Web Title: Priya's Complaint: Lover Ghazaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.