टाेलनाक्यावर फास्टॅगसंदर्भातील अडचणी कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:04+5:302021-02-23T04:11:04+5:30
नागपूर : १५ फेब्रुवारीपासून टाेलनाक्यावर इलेक्ट्राॅनिक्स टाेल वसुली बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र बॅलेन्स असूनही काही टाेलनाक्यावर फास्टॅग स्कॅन ...
नागपूर : १५ फेब्रुवारीपासून टाेलनाक्यावर इलेक्ट्राॅनिक्स टाेल वसुली बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र बॅलेन्स असूनही काही टाेलनाक्यावर फास्टॅग स्कॅन हाेण्यास अडचणी येत आहेत. शिवाय अनेकांनी फास्टॅग प्रणालीचा अवलंब केला नसल्याने टोलनाक्यावर त्यांची त्रेधातिरपिट उडत आहे.
काही टोलनाक्यावर तर फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांकडून दुप्पट वसुली केली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ज्यांच्याकडे अद्यापही फास्टॅग नाही त्यांच्यामुळे टोलनाक्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे फास्टॅग असलेल्या वाहनचालकांना अनावश्यक टोलनाक्यावर थांबावे लागत असल्याचे चित्र आहे.
एका टोलनाक्यावर तर कर्मचाऱ्यांकडून विशिष्ट बँकेच्या माध्यमातूनच फास्टॅग कार्ड बनविण्यावर जोर देण्यात येत होता. टाेलनाक्यावर काही समस्या आल्यास मदत किंवा तक्रारीसाठी १०३३ हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. मात्र या क्रमांकावर संपर्क साधला असता अनेकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘आमचे सर्व एक्झिक्युटिव्ह दुसऱ्या काॅलवर व्यस्त आहेत, ते लवकरच आपल्याशी संपर्क करतील’, हेच ऐकायला मिळत असल्याची वाहनचालकांची तक्रार आहे.