कारखान्यातच प्रीकास्ट रोडची निर्मिती व्हावी :  नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:11 PM2019-06-14T22:11:07+5:302019-06-14T22:12:08+5:30

रस्ते बांधकामात खूप समस्या येतात. यामुळे कारखान्यातच प्रीकास्ट रोडची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी रोड प्रीकास्टमध्ये फ्लाय अ‍ॅॅशचा वापर केल्यास पर्यावरण संवर्धनासही वाव मिळेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Production of a precast road in the factory: Nitin Gadkari | कारखान्यातच प्रीकास्ट रोडची निर्मिती व्हावी :  नितीन गडकरी

कारखान्यातच प्रीकास्ट रोडची निर्मिती व्हावी :  नितीन गडकरी

Next
ठळक मुद्दे१० व्या प्रादेशिक ग्रीह परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते बांधकामात खूप समस्या येतात. यामुळे कारखान्यातच प्रीकास्ट रोडची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी रोड प्रीकास्टमध्ये फ्लाय अ‍ॅॅशचा वापर केल्यास पर्यावरण संवर्धनासही वाव मिळेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रीह कौन्सिल, तसेच द एनजी रिसर्च इन्स्टिटयूट (टेरी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहाव्या रिजनल ग्रीह कौन्सिलचे उद्घाटन शुक्रवारी नागपुरातील एका हॉटेलमध्ये गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिल सगणे, ग्रीह कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ उपास्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, हरित वास्तु निर्मितीमध्ये बांधकाम खर्च कमी करण्यासाठी व वास्तू आर्थिकदृष्ट्या किफायतशीर राहण्यासाठी अभियत्यांनी चाकोरीबाहेर विचार करून नवकल्पनांचा वापर करावा. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे रस्त्यांच्या कामात तलाव नाले यांच्या खोलीकरणातून मिळालेली माती, व इतर सामग्री वापरली जात आहे, यामुळे जलसंधारण होऊन रस्तेप्रकल्प खर्चात बचत होत आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणीतून मिळणारी वाळू स्वस्त दरात जनसामान्यांना उपलब्ध करून दिली जात असल्याने बांधकाम खर्चात कपात होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सांडपाणी, भाजीपाला, फळे यांच्या टाकाऊ सामग्रीतून बायोडायजेस्टर व्दारे बायो.सीएनजी. निर्मितीचा प्रकल्प आता पूर्व विदर्भातील जिल्ह्यात सुरू होणार असून नागपुरात बायो-सीएनजीवर संचालित बसेसचेही लोकार्पणही होणार आहे.
याप्रसंगी ग्रीह कौन्सिलतर्फे आसित्वात असणाऱ्या इमारतीच्या फाईव्ह स्टार रेटींगचा पुरस्कार पुण्याचे राजभवन, सोलापूरच्या करकंब येथील ग्रामीण रुग्णालय व वाशिम जिल्हयातील मालेगाव जहांगीरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह या तीन वास्तूंना देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना विशेष योगदानाबद्दल मंत्रिमहोदयांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. ग्रीह राईजिंग अवॉर्ड श्रेणी अंतर्गत पुणे नाशिक, कोकण, नागपूर अमरावती असे विभागवार पुरस्कार उत्कृष्ट कामगिरी करणाºया अभियंत्यांना वितरित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे होते. याप्रसंगी ग्रीह कौन्सिल व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात पर्यावरण सक्षम बांधकाम संदर्भातील धोरण पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले.

Web Title: Production of a precast road in the factory: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.