वर्ध्यात रेमडेसिविरचे उत्पादन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:38+5:302021-05-07T04:08:38+5:30
नागपूर : वर्धा येथे अखेर गुरुवारपासून रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले. यामुळे विदर्भ व महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा ...
नागपूर : वर्धा येथे अखेर गुरुवारपासून रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले. यामुळे विदर्भ व महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्यानंतर आज हे उत्पादन सुरू झाले आहे. रविवारपर्यंत रेमडेसिविरचे एक लाख इंजेक्शन लोकांपर्यंत पोहोचतील. दररोज ३० हजार डोसचे उत्पादन होणार आहे.
वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीत हे उत्पादन सुरू झाले आहे. जिलेड या अमेरिकन कंपनीकडे रेमडेसिविरचे पेटंट असून, या कंपनीने भारतात सात विविध कंपन्यांना हे इंजेक्शन निर्मितीचा परवाना दिला आहे. यातील एक हेट्रो फार्मा, या हैदराबाद येथील कंपनीसोबत वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेसने करार केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा येथे जाऊन यासंदर्भात पाहणी केली व सखोल माहिती जाणून घेतली.