विशेष मुलाखत; लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता २० टनावर न्यायची आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 09:21 AM2020-10-07T09:21:42+5:302020-10-07T09:22:02+5:30

citrus fruits Nagpur News लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये देशाची उत्पादकता १२ ते १३ प्रति हेक्टर टनावर पोहचली असली तरी ती आम्हाला २० टन प्रति हेक्टरवर न्यायची आहे, असा विश्वास केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केला.

The productivity of citrus fruits is to be increased at 20 tons | विशेष मुलाखत; लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता २० टनावर न्यायची आहे

विशेष मुलाखत; लिंबूवर्गीय फळांची उत्पादकता २० टनावर न्यायची आहे

googlenewsNext

गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये देशाची उत्पादकता २५ वर्षांपूर्वी ६ ते ७ प्रति हेक्टर टन होती. आज ती १२ ते १३ प्रति हेक्टर टनावर पोहचली असली तरी ती आम्हाला २० टन प्रति हेक्टरवर न्यायची आहे, असा विश्वास केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केला.

देशात एकमेव असलेल्या नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या यशाबद्दल डॉ. लदानिया म्हणाले, लिंबूवर्गीय फळपिकांच्या निर्यातीमध्ये आज चीन पहिल्या तर ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसºया स्थानावर आहे. दरवर्षी ८० ते ९० हजार टन लिंबूवर्गीय फळपिकांची निर्यात भारतामधून होते. भविष्यात वाढलेल्या उत्पादकतेमधून हे चित्र बदलेले असेल. रोगमुक्त आणि कमी खर्चात अधिक उत्पादकतेच्या कलमा देणे व त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे हा आमचा हेतू आहे. त्यासाठी नव्या प्रजाती शोधून त्या स्थानिक वातावरणामध्ये विकसित करण्यासाठी आमचे संशोधन सातत्याने सुरू असते. मागील पाच वर्षात संस्थेने १७ लाख रोगमुक्त कलमा दिल्या. त्याची परिणती आता वाढलेल्या उत्पादकतेमध्ये दिसत आहे.

उत्पादकता वाढीसाढी नवे तंत्रज्ञान वापरत असल्याचे सांगून डॉ. लदानिया म्हणाले, सध्या एका हेक्टरमध्ये २७७ झाडे लावली जातात. यापुढे नव्या तंत्रातून ७०० ते ८०० झाले लावली जातील. ६ बाय ६ ऐवजी ६ बाय ३ असे अंतर राहील. ६ वर्षापूर्वी संशोधन केंद्रात केलेला हा प्रयोग आता यशस्वी ठरला आहे. शुट-टिप-ड्राफ्टिंग हे तंत्र वापरून मातृवृक्ष रोगमुक्त करण्याचे विशेष संशोधन संस्थेने केले आहे.

१५ वर्षातील संशोधन
मागील १५ वर्षात केंद्रातून मोसंबी, संत्रा, लिंबूच्या अनेक प्रजाती संशोधित आणि वितरित झाल्या आहेत. डिंक्या रोगाला प्रतिकारक असलेली अलिमाऊ संत्रा ही प्रजाती २०१२-१३ मध्ये संशोधित झाली. लिंबूमध्ये एनआरसीसी-७, एनआरसीसी-८, यासह ९ प्रजाती संशोधित व वितरित झाल्या आहेत. कमी बियांच्या तीन संत्रा जाती एनआरसीसी सीडलेस-४, मोसंबीमध्ये ज्यूससाठी कटर व्हॅलेन्सिया, पमोलोमध्ये एनआरसीसी-५ यासह विविध प्रकारच्या ६१५ प्रजातींचे संशेधन झाले आहे. मोसंंबीमध्ये जाफा व ब्लड रेड माल्टा, ब्राझीलवरून आणलेल्या वेस्टीन आणि हॅमलिन या चार प्रजाती तसेच संत्रामध्ये पर्ल टँजेलो आणि डेझी या दोन अशा ६ प्रजाती नव्यानेच विकसित झाल्या आहेत.

 

Web Title: The productivity of citrus fruits is to be increased at 20 tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fruitsफळे