प्रो.हरेराम त्रिपाठी कविकुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठाचे नवे कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2023 09:00 AM2023-05-21T09:00:00+5:302023-05-21T09:00:02+5:30
Nagpur News वाराणशीच्या संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कलगुरू प्रो.हरेराम त्रिपाठी यांची कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठाचे नवे कुलगुरू असतील.
नागपूर : दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर रामटेक येथील कविकुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत. वाराणशीच्या संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कलगुरू प्रो.हरेराम त्रिपाठी यांची कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठाचे नवे कुलगुरू असतील. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी त्रिपाठी यांची निवड केली आहे.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.श्रीनिवास वरखेडी यांची दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठात कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर रामटेकचे पद रिक्त होते. प्रभारी कुलगुरू म्हणून प्रो.मधुसूदन पेन्ना यांच्याकडे कार्यभार होता.
त्रिपाठी यांचे संस्कृत शिक्षण काशी येथे झाले आहे. भारतीय दर्शन, शांकर वेदान्त, न्यायशास्त्र, सांख्ययोग, न्यायवैशैषिक शास्त्रांमध्ये पारंगत असलेले त्रिपाठी यांनी आचार्य परीक्षेत सर्वाधिक सुवर्ण पदके प्राप्त झाली आहेत. त्रिपाठी यांच्या कारकिर्दीची सुरुवात केंद्रीय संस्कृत विद्यापीठातून झाली आहे. त्यानंतर, लालबहादूर शास्त्री विद्यापीठात सर्वधर्म विभागात प्रोफेसर, अधिष्ठाता व विभाग म्हणून कार्यरत होते. त्यानंतर, वाराणशीच्या संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात गत दोन वर्षांपासून कुलगुरूपदी कार्यरत होते.