प्राध्यापक ते न्यायाधीश
By admin | Published: April 2, 2016 03:27 AM2016-04-02T03:27:17+5:302016-04-02T03:27:17+5:30
गणेडीवाला या २०१० मध्ये नागपूर जिल्हा न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून होत्या.
पुष्पा गणेडीवाला प्रधान न्यायाधीश
नागपूर : गणेडीवाला या २०१० मध्ये नागपूर जिल्हा न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून होत्या. त्यांनी ५ फेब्रुवारी २०१० रोजी सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव येथील अशोक देशमुख खून आणि इतर पाच जणांवरील खुनी हल्लाप्रकरणी सुधीर अण्णाजी चौधरीसह २१ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येतील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याचा पहिला निर्णय ठरला होता. उच्च न्यायालयानेही २४ जानेवारी २०११ सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. पुष्पा गणेडीवाला ह्या एम.कॉम, एलएलएम गोल्ड मेडॅलिस्ट आहेत. त्याचबरोबर त्यांनी नेट-सेट सुध्दा केलेले आहे. भारताच्या सर्वात जुन्या सॉलिसिटर फर्म मेसर्स क्रावफोर्ड बेली अॅण्ड कंपनी, फोर्ट मुंबई येथील कामाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा दिली आहे. अमरावती जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिली केली आहे. त्यांची आॅक्टोबर २००७ मध्ये थेट जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. (प्रतिनिधी)