समाजकार्याचे प्राध्यापक वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:32+5:302021-09-02T04:17:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : विद्यार्थ्यांना समाजकार्याचे धडे देणाऱ्या राज्यभरातील समाजकार्य महाविद्यालयांतील प्राध्यापकांना तब्बल तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. ...

Professor of social work deprived of salary | समाजकार्याचे प्राध्यापक वेतनापासून वंचित

समाजकार्याचे प्राध्यापक वेतनापासून वंचित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : विद्यार्थ्यांना समाजकार्याचे धडे देणाऱ्या राज्यभरातील समाजकार्य महाविद्यालयांतील प्राध्यापकांना तब्बल तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. वेतनापासून वंचित ठरत असल्याने प्राध्यापकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत जिल्ह्यात एकूण ११ समाजकार्य महाविद्यालये आहेत. दर महिन्याच्या १ तारखेला वेतन मिळायला हवे. वेतन वेळेत मिळत नाही. यासाठीही आम्ही वारंवार आपली समस्या मांडली. अशातच आता शासन तसेच समाजकल्याण विभागाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हाल-बेहाल होत आहेत. अनेकांनी गृहकर्ज, वाहन, वैयक्तिक, भविष्यनिर्वाह निधी, जीपीएफ, आदींचा वेळीच भरणा न केल्याने दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कोरोना, डेंग्यू, आदी आजारांनी अनेकांना बेजार केले आहे. सण-समारंभसुद्धा सुरू आहेत. अशा वेळी विविध अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची कैफियत प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी मांडली. चर्चा, निवेदने आणि विनंतीला केराची टोपलीच दाखविण्यात आल्याचा आरोप करीत, तातडीने आमची समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Professor of social work deprived of salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.