अन् प्राध्यापकाच्या पत्नीने धर्मेश धवनकरांच्या कानशिलात लगावली; व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 03:25 PM2022-11-23T15:25:06+5:302022-11-23T15:30:56+5:30

आपले दागिने विकून पैसे दिल्याचा आराेप

professor's wife slapped Dharmesh Dhawankar at RTM Nagpur University, video viral | अन् प्राध्यापकाच्या पत्नीने धर्मेश धवनकरांच्या कानशिलात लगावली; व्हिडीओ व्हायरल

अन् प्राध्यापकाच्या पत्नीने धर्मेश धवनकरांच्या कानशिलात लगावली; व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमाेजणी सुरू असताना दिवसभर चर्चा हाेती ती एका महिलेने सहायक प्राध्यापक धर्मेश धवनकरांच्या कानशिलात लगावलेल्या ‘थप्पड’ची. बनावट लैंगिक तक्रारीची भीती दाखवून राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सात विभागप्रमुखांकडून खंडणी वसुली केल्याचा आराेप धवनकरांवर आहे. यातील एका पीडित विभागप्रमुखाच्या पत्नीने सार्वजनिक ठिकाणी धवनकरांना थप्पड मारली. या घटनेचा व्हिडीओ सध्या साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे.

ही घटना २० नाेव्हेंबर राेजी सिनेट निवडणुकीचे मतदान केंद्र असलेल्या विधी महाविद्यालयात दुपारी ३.३० वाजता घडली. थप्पड मारणारी महिला प्रा. खाेब्रागडे यांची पत्नी असल्याचे बाेलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधी महाविद्यालयात विद्यापीठ शिक्षकांसाठी मतदान केंद्र होते. त्यामुळे घटनेच्या वेळी बरीच गर्दी होती. मतदारांचे येणे-जाणे सुरू होते. सर्व उमेदवारही परिसरात टेबल-खुर्ची लावून बसून होते.

दुपारी ३.३० वाजता धर्मेश धवनकर मतदानासाठी विधी महाविद्यालयात पोहचले. मतदान केल्यानंतर बाहरे निघताच जिथे प्राध्यापक उपस्थित होते, तिथे पोहचले. यामध्ये धवनकरांवर खंडणी मागण्याचा आराेप करणाऱ्या पीडित प्राध्यापकांचाही समावेश होता. तेव्हा अचानकपणे पीडित प्राध्यापकांची पत्नी तिथे पोहचली आणि धवनकर यांना चांगलेच खडसावले. धवनकर तिथून सुटका करण्याचा प्रयत्न करीत हाेते. अशात अचानक महिलेने धवनकरांना थप्पड मारली. या कृतीमुळे तेथे उपस्थित सर्व लाेक थक्क झाले. लोकांना काहीच समजले नाही; पण सर्वत्र शांतता पसरली हाेती. काही वेळाने धवनकर तिथून निघून गेले. मात्र, या घटनेची चर्चा विद्यापीठ वर्तुळात जाेर धरत आहे.

पतीने आत्महत्या केली असती तर?

धवनकरांशी बाेलताना महिलेचा राग अनावर झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. पीडित प्राध्यापकाने आपले दागिने गहान ठेवून पैशांचा पुरवठा केल्याचा राग त्यांच्या पत्नीने व्यक्त केला. तुमच्या प्रतारणेमुळे त्रासून पतीने आत्महत्या केली असती तर तुम्ही त्यांना परत आणले असते काय, असा सवाल पत्नीने धवनकरांना केला. ते काढता पाय घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहून रागाच्या भरात महिलेने त्यांच्या कानशिलात लगावली.

Web Title: professor's wife slapped Dharmesh Dhawankar at RTM Nagpur University, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.