कामात समाधान असेल तर प्रगतीही शक्य
By admin | Published: July 31, 2014 01:05 AM2014-07-31T01:05:39+5:302014-07-31T01:05:39+5:30
समाधान मिळत नसेल तर, त्या कामाला अर्थ नाही. अनेकजण आयुष्यभर नोकरी करतात. मात्र ते आपल्या कामात समाधानी नसतात. मुळात ते मनाने काम करीत नाही. कामात जर समाधान
गोपीचंद रामटेके : निर्मला मुकादम जीवनगौरव पुरस्कार
नागपूर : समाधान मिळत नसेल तर, त्या कामाला अर्थ नाही. अनेकजण आयुष्यभर नोकरी करतात. मात्र ते आपल्या कामात समाधानी नसतात. मुळात ते मनाने काम करीत नाही. कामात जर समाधान असेल तर प्रगतीची दारे नक्कीच उघडतात, असे मत प्रसिद्ध फिजिओथेरेपिस्ट व रवी नायर कॉलेज आॅफ मेडिकल सायन्स, सावंगीचे संचालक डॉ. गोपीचंद रामटेके यांनी व्यक्त केले. नारक ोडतर्फे फिजिओथेरेपी क्षेत्रातील डॉ. निर्मला मुकादम जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्काराप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
नारकोड ही फिजिओथेरेपी क्षेत्रात काम करणारी मध्य भारतातील सर्वात मोठी संस्था आहे. संस्थेच्यावतीने दरवर्षी डॉ. निर्मला मुकादम जीवनगौरव पुरस्काराने या क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कृत करण्यात येते.
यंदा या पुरस्काराने गोपीचंद रामटेके यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला डॉ. बी. जे. सुभेदार, डॉ. स्नेहा देशपांडे, डॉ. जे. आर. खेर, नारकोडच्या संचालक डॉ. नीता मोडक, डॉ. गंधे उपस्थित होते. डॉ. सुभेदार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. रामटेके १९७४ पासून फिजिओथेरपी या क्षेत्रात कार्यरत आहे. मेडिकल सायन्समध्ये फिजिओथेरपी हे क्षेत्र कमी दर्जाचे गणले जाते. पूर्वी याला हातपाय हलविण्याचा कोर्स म्हणून चेष्टा करायचे. मात्र या क्षेत्रात रामटेके यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी मेडिकलमध्ये कार्य केले आहे. ते कार्यरत असताना या विभागाचा दर्जा वाढविला आहे.
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांपेक्षा फिजिओच्या विद्यार्थ्यांना अधिक स्टायपंड मिळवून दिला आहे. हे सर्व सातत्याने काम केल्याने आणि कामामध्ये समाधानी असल्यानेच शक्य झाले आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)