‘सेवाग्राम’मधील कामांना मिळणार गती

By admin | Published: June 7, 2017 02:04 AM2017-06-07T02:04:18+5:302017-06-07T02:04:18+5:30

सेवाग्राम परिसरात पायाभूत नागरी सुविधांच्या विकासाला आता गती मिळणार आहे.

Progress in 'Seva Gram' will be speed | ‘सेवाग्राम’मधील कामांना मिळणार गती

‘सेवाग्राम’मधील कामांना मिळणार गती

Next

अपूर्व चंद्रा यांचे निर्देश : १४५ कोटीच्या खर्चास मान्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेवाग्राम परिसरात पायाभूत नागरी सुविधांच्या विकासाला आता गती मिळणार आहे. सेवाग्राम परिसर विकास आराखड्यात समाविष्ट असलेली कामे त्वरित सुरू करून जलद पूर्ण करण्यात यावीत, असे राज्याचे नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, मीरा अडारकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी झालेल्या शिखर बैठकीत सेवाग्राम विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार सेवाग्राम परिसरात पायाभूत नागरी सुविधा निर्मितीसाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत सेवाग्राम परिसर विकास आराखड्यात समाविष्ट कामांचा तसेच अन्य कामांसाठी १४५ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. यामध्ये सेवाग्राम आश्रमातील यात्री निवास व संबंधित कामे, वारसा संवर्धन व नागरी रचनेअंतर्गत कामे, पर्यावरण, पायाभूत सुविधांचा विकास तसेच हेरिटेज पर्यटन विकासासाठी नागरी सुविधा, धाम नदीकाठाचा विकास, नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. या कामांबाबातची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांची मान्यता या बाबी कालबध्द पध्दतीने पूर्ण कराव्यात तसेच या कामांबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधितांची बैठक घ्यावी, असे सांगितले.

मोठा ताजबाग विकास आराखड्याचे सादरीकरण
यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नागपुरातील मोठा ताजबागच्या नियोजित विकास आराखड्याचे सादरीकरण केले. मोठा ताजबाग विकासासाठी १३२ कोटी रुपयांचा निधी नियोजित असून, २४ एकर जागेच्या परिसरात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पायाभूत सुविधा व परिसर सौंदर्यीकरण करण्यासाठी आराखडा तयार करून त्याचे संनियंत्रण करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोठा ताजबागच्या विकासकामांच्या पहिल्या टप्प्यात दर्गा कॉम्प्लेक्स, ऊर्स मैदानाची संरक्षण भिंत, पथदिवे, रस्त्यांचे डांबरीकरण, तसेच प्रसाधनगृहांचे काम, मुख्य प्रवेशद्वार, विस्थापितांकरिता शॉपिंग कॉम्प्लेक्सचा समावेश असून, त्यासोबतच दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सादरीकरणातून सांगितले.
 

Web Title: Progress in 'Seva Gram' will be speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.