घरोघरी जाऊन राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:08+5:302021-08-26T04:12:08+5:30

कोराडी : येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा प्रचार व प्रसार करण्याचा उपक्रम ...

Promoting the thoughts of Rashtrasantha from house to house | घरोघरी जाऊन राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार

घरोघरी जाऊन राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार

Next

कोराडी : येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा प्रचार व प्रसार करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दररोज सकाळी घरोघरी जाऊन सामुदायिक ध्यान व ग्रामगीता वाचन तसेच उपस्थितांपैकी राष्ट्रसंतांचे विचार यावर मते नाेंदविली जात आहेत. बुधवारी (दि.२५) कोराडी येथील गोपाल ढेंगरे यांच्या घरी हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी ध्यानाच्या महत्त्वावर अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाचे कामठी तालुका सर्वाधिकारी प्रकाश भालेराव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बबनराव ढेंगरे, सुनील बर्गी, बाळकृष्ण झाडोकर, दामू करडमारे, सुरेश चौधरी, संदीप घुरडे, शेषराव सपकाळ, भूदेव वांढे, संभाजी साेनवाणे, नामदेव चौधरी, गंगाराम गौरकर, चैतन्य कडसकर, देवनाथ माहुरे, युगल राऊत, प्रिन्स काळे, अक्षय काळे, गोपाल ढेंगरे, रोहन ढेंगरे, सरलाबाई ढेंगरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Promoting the thoughts of Rashtrasantha from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.