जि.प.तील ५१ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:36+5:302021-03-06T04:07:36+5:30
नागपूर : जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडून संनियंत्रित चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक वर्ग-३ पदावर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन ...
नागपूर : जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडून संनियंत्रित चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक वर्ग-३ पदावर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाच्या तरतुदी विचारात घेऊन पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये ४८ परिचारकांना कनिष्ठ सहायक लिपिकवर्गीय पदावर तर ३ परिचारकांना कनिष्ठ सहायक लेखा पदावर पदोन्नती देण्यात आली. एकूण ५१ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत पारदर्शक पद्धतीनुसार समुपदेशन पदोन्नतीने पदस्थापना प्रक्रिया पार पडली. पदोन्नत कर्मचाऱ्यांमध्ये १३ दिव्यांग कर्मचाऱ्यांना समुपदेशनात प्रथम संधी देण्यात आली.
समुपदेशनाच्या दिवशीच पदोन्नत कर्मचाऱ्यांना समुपदेशनाच्या ठिकाणी पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. समुपदेशनाच्या ठिकाणी कोविड-१९ च्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवण्याचे पालन करून पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पडली.