नागपूर मनपाच्या कर विभागात ‘परफॉर्मन्स’वर बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:11 AM2018-03-22T00:11:12+5:302018-03-22T00:11:24+5:30

महापालिकेच्या कर विभागातील काही कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. काही हलगर्जीपणा करतात. कर वसुलीकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. अशा कर्मचाऱ्यांचा डाटा संग्रहित केला जात आहे. यावर अभ्यास करून केवळ ‘परफॉर्मन्स’ चांगला असलेल्यांनाच बढती देण्यात येईल. निष्क्रिय कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. असा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी बुधवारी दिला.

Promotion on 'performance' in Municipal corporation tax department | नागपूर मनपाच्या कर विभागात ‘परफॉर्मन्स’वर बढती

नागपूर मनपाच्या कर विभागात ‘परफॉर्मन्स’वर बढती

Next
ठळक मुद्देकुकरेजा यांचा कामचुकारांना इशारा : हनुमाननगर, नेहरूनगर व गांधीबाग झोनच्या वसुलीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या कर विभागातील काही कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. काही हलगर्जीपणा करतात. कर वसुलीकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. अशा कर्मचाऱ्यांचा डाटा संग्रहित केला जात आहे. यावर अभ्यास करून केवळ ‘परफॉर्मन्स’ चांगला असलेल्यांनाच बढती देण्यात येईल. निष्क्रिय कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. असा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी बुधवारी दिला.
मालमत्ता कर वसुलीचा आढवा घेण्यासाठी हनुमाननगर, नेहरूनगर आणि गांधीबाग झोन कार्यालयात बैठकी घेण्यात आल्या . मार्च महिना संपायला १० दिवस शिल्लक असतानाही ज्या कर्मचाऱ्यांनी उद्दिष्ट ५० टक्के ही गाठले नाही अशा कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली.. २५ मार्चपर्यंत त्यांच्या कार्यात काय प्रगती आहे, याचा अहवाल त्यांनी सहायक आयुक्तांमार्फत मागविला. चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही कुकरेजा यांनी दिली. अडचणींवर मात करून, मार्ग काढून करवसुलीचे उद्दिष्ट गाठा, असे निर्देश त्यांनी दिले.
हनुमाननगर झोनच्या बैठकीत सहायक आयुक्त राजू भिवगडे यांनी कर वसुलीसंदर्भात आणि त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. हनुमाननगर झोनअंतर्गत ७४३३८ मालमत्ता असून ६२६५२ निवासी आहेत. ६४१७ व्यावसायिक असून ५२६९ खुले भूखंड आहेत. २० कोटी २४ लाख रुपये जुनी वसुली येणे बाकी असून नवीन डिमांड १७ कोटी १५ लाखांची आहे. करापोटी एकूण ३७ कोटी ३९ लाख रुपये येणे असल्याचे त्यांनी सांगितले.
नेहरूनगर झोनअंतर्गत एकूण २२ कोटी ७६ लाख रुपये वसूल करावयाचे आहेत. त्यापैकी १० कोटी ८६ लाख जुनी वसुली असून ११ कोटी १० लाख रुपये चालू वषार्ची डिमांड असल्याची माहिती सहायक आयुक्त राजेश कराडे यांनी दिली. हनुमाननगर झोनच्या बैठकीला सभापती भगवान मेंढे, स्थायी समितीचे सदस्य नागेश मानकर, नगरसेविका मंगला खेकरे, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, कर निर्धारक तथा संग्राहक दिनकर उमरेडकर, प्रफुल्ल फरकासे, नेहरूनगर झोनच्या बैठकीत झोन सभापती रेखा साकोरे तर गांधीबाग झोनच्या बैठकीत सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते.
विवादित मालमत्तांचा प्रश्न निकाली काढा
प्रत्येक झोनअंतर्गत काही विवादित मालमत्ता आहेत. त्यांच्यावरील कराची रक्कम दर वर्षीच्या थकीत रकमेमध्ये दिसून येते. यामुळे उद्दिष्ट वाढलेले असते. एप्रिल महिन्यापासून या सर्व मालमत्तांची प्रकरणे निकाली काढण्यात येतील. यासोबतच काही शासकीय मालमत्ता, काही निमशासकीय मालमत्ता ज्यांच्या करवसुलीसंदर्भात काही अडथळे आहेत, अशी प्रकरणेही निकाली काढण्यात येतील. अशा मालमत्तांचा प्रस्ताव झोन कार्यालयांनी स्थायी समितीकडे पाठवावा, असे निर्देशही वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

Web Title: Promotion on 'performance' in Municipal corporation tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.