संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:52+5:302021-09-19T04:08:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : संस्कृती ही इतर भाषांची जननी आहे. त्यामुळे या भाषेचा व्यापक स्वरुपात प्रचार-प्रसार व्हावा, असे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : संस्कृती ही इतर भाषांची जननी आहे. त्यामुळे या भाषेचा व्यापक स्वरुपात प्रचार-प्रसार व्हावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय संस्कृत भारती संघटनेचे पदाधिकारी दिनेश कामत यांनी रामटेक येथे आयाेजित संस्कृत महाेत्सवाच्या समाराेपीय कार्यक्रमात केले.
रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने संस्कृत महाेत्सव-२०२१चे आयाेजन करण्यात आले हाेते. या महाेत्सवाचा समाराेप नुकताच करण्यात आला. समाराेपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी हाेते, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, प्रा. कृष्णकुमार पांडेय, प्रा. कविता हाेले उपस्थित हाेते.
संपूर्ण देशभरातील विविध संस्था, विद्यापीठे आणि संस्कृत प्रेमींना जाेडणे, तसेच संस्कृत कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पाेहोचणे हा या संस्कृत महाेत्सवाच्या प्रयाेजन मूळ उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांच्यासह इतर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. प्रा. कृष्णकुमार पांडेय यांनी प्रास्ताविक केले. संचालन सुमित कठाळे यांनी केले, तर कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व संस्कृतप्रेमी नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.