नागपुरात प्रॉपर्टी डीलरची १५ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 11:04 PM2021-05-05T23:04:17+5:302021-05-05T23:05:14+5:30
Property dealer cheated by Rs 15 lakh, crime news संपत्ती खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यास स्टेशनरीचा कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपी संदीप जैन (५०) रा. व्यंकटेशनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपत्ती खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यास स्टेशनरीचा कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपी संदीप जैन (५०) रा. व्यंकटेशनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित संजय पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जैन याचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्याला स्टेशनरीचा कारखाना सुरू करायचा होता. त्यासाठी त्याने जागा बघितली होती. परंतु व्यवसाय सुरू करण्यास ३० लाख रुपयांची गरज होती. आरोपी जैन याने संजय पोतदार यांना ५० टक्क्याचा भागीदार बनविण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली. पोतदार यांनी १५ लाख रुपयांचा धनादेश दिला. बरेच दिवस लोटूनही व्यवसाय सुरू झाला नाही, त्यामुळे पोतदार त्याला विचारणा करू लागले. जैन हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पैसेही परत करीत नसल्यामुळे पोतदार यांनी नंदनवन पोलिसात तक्रार दाखल केली. सूत्रांच्या माहितीनुसार जैन यांनी अनेकांना फसविले आहे.