टाकून देणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:09 PM2019-08-19T23:09:26+5:302019-08-19T23:11:31+5:30

माता म्हटले की प्रेम, वास्तल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता मुलगी झाली म्हणून जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात.

The proportion of girls is 80 percent which discarded | टाकून देणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८० टक्के

टाकून देणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८० टक्के

Next
ठळक मुद्देतीन वर्षांत २९३ बालके बेवारस :कुमारी मातांकडून टाकून देणाऱ्या बालकांचे प्रमाण ६० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माता म्हटले की प्रेम, वास्तल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता मुलगी झाली म्हणून जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. कुणाला कचराकुंडीत, रस्त्यालगत, एस.टी.बसमध्ये, देवळासमोर, इस्पितळात तर कुणाला थेट अनाथालयात बेवारस सोडून फरार होतात. बाल कल्याण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१४ ते २०१७ या कालावधीत शून्य ते सहा वयोगटातील २९३ बालके बेवारस मिळाली. यात कुमारी मातांकडून टाकून दिलेल्या बालकांचे प्रमाण ६० टक्के आहे. बेवारस स्थितीत आढळून येणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८० टक्के आहे.
रविवारी रात्री बेलतरोडी मार्गावरील मनीषनगर परिसरात एका चारचाकी वाहनाखाली एक दिवसाची चिमुकली आढळून येताच, पुन्हा एकदा कुमारी माता व नाकारला जाणारा मुलीचा जन्माचा प्रश्न सामोर आला आहे.
बदलती जीवनशैली, समाज माध्यमांचे तरुणाईवर असणारे गारुड, लैंगिक शिक्षणाचा अभाव, भिन्नलिंगी आकर्षण यासह अन्य काही कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अधोरेखीत झाले आहे. जुन्या आकडेवारीनुसार शहरात हे प्रमाण ६.० टक्के, तर ग्रामीण भागात १०.४ टक्के इतके आहे. साधारणत १५ ते १९ हा वयोगट शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणारा असतो. त्यात कुमारी अवस्थेत गर्भवती किंवा माता होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. अनैतिक संबंध, गरिबी, लाचारी व निरक्षरतेमुळे होणारी तरुणींची फसवणूक या मागील मुख्य कारण असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, स्त्री म्हणजे आईबापाच्या जीवाला घोर, परक्याघरचे धन. स्त्री म्हणजे हुंड्याचा अकारण भार, या समाजाच्या मानसिकतेला आजही स्त्री-जन्माबाबत कमालीचे औदासिन्य आढळून येते. अलिकडच्या काळात यात सुधारणा होत असलीतरी दुसरी किंवा तिसरी मुलगी झाल्यास तिला टाकून देण्याची मानसिकता अद्यापही कायम असल्याचेही रविवारच्या घटनेतून पुढे आले आहे. बाल कल्याण समितीकडून उपलब्ध माहितीनुसार आई असतानाही गेल्या तीन वर्षांमध्ये शून्य ते सहा वर्षांची २९३ निष्पाप बालके दुधाला मुकली आहेत.
त्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक
रविवारी वाहनाखाली पोलिसांना सापडलेल्या त्या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे मेडिकलच्या बालरोग विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनुसार, जन्माला आल्यानंतर तिला मातेचे दूध मिळाले नव्हते. उघड्यावर ठेवण्यात आल्याने थंड पडलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या चिमुकलीवर आवश्यक सर्व उपचार सुरू आहेत. तिच्या आरोग्याकडे डॉक्टरांसोबतच मेडिकलचे सामाजिक कार्यकर्ता लक्ष ठेऊन आहेत.

Web Title: The proportion of girls is 80 percent which discarded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर