कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्ताव प्रलंबित : मनपाचा शासनाकडे पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:55 PM2019-05-08T23:55:40+5:302019-05-08T23:56:35+5:30

भांडेवाडी येथे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रि या करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यातून दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण होणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असून तो प्रलंबित आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतच्या निविदा काढण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

The proposal for creation of electricity from the waste is pending: Follow up with the Goverment of the NMC | कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्ताव प्रलंबित : मनपाचा शासनाकडे पाठपुरावा

कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्ताव प्रलंबित : मनपाचा शासनाकडे पाठपुरावा

Next
ठळक मुद्देआचारसंहितेनंतर निविदा प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडेवाडी येथे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रि या करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यातून दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण होणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असून तो प्रलंबित आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतच्या निविदा काढण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
स्वच्छ सर्वेक्षणात शहर माघारल्याने स्वच्छतेवर प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. परंतु कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प राबविताना यातून निर्माण होणाऱ्या जैव उत्पादनातून महापालिकेला उत्पन्न व्हावे या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न आहेत. भांडेवाडी येथे शहरातील कचरा साठविला जातो. कचरा प्रक्रिया प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. मात्र बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहे. जूनपासून दर महिन्याला भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथील एक एकर जागा खाली होणार आहे. काही महिन्यात भांडेवाडी येथील २१ एकच जागा खाली होईल. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होणारा दुर्गंधीचा त्रास कायमचा बंद होणार आहे.
भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे काही वर्षापूर्वी हंजर कंपनी कचऱ्यापासून खत तयार करण्याचे काम करीत होती. परंतु हा प्रकल्प काही वर्षातच बंद पडला. त्यामुळे दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण झाल्यास समस्या त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आधीच नियोजन करावे लागणार आहे. बायोडिझेल व सीएनजी निर्माण केल्यास महापालिकेच्या बसेस त्यावर चालविता येईल. याचा विचार करता बायोडिझेल व सीएनजी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे.
स्वच्छतेत क्रमांक घसरला
शहरातून दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यावर प्रक्रिया होत नसल्याने स्वच्छतेत नागपूरचा क्रमांक घसरला. याचा विचार करता महापालिकेच्या दहा झोनमध्ये दहा कचरा ट्रान्सफर स्टेशन उभारले जाणार आहेत. हनुमाननगर झोनमधील बुधवार बाजार येथे स्टेशन सुरू करण्यात आले आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होत असल्याने स्टेशन परिसरातील नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीपासून त्रास होत नाही. याच धर्तीवर शहरातील इतर झोनमध्ये ट्रान्सफर स्टेशन उभारले जाणार आहेत.

Web Title: The proposal for creation of electricity from the waste is pending: Follow up with the Goverment of the NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.