इतवारीतून अधिक रेल्वेगाड्या चालविण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:12 AM2021-09-17T04:12:43+5:302021-09-17T04:12:43+5:30
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक आलोक कुमार यांनी इतवारी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा करून तेथील सोयी-सुविधांची पाहणी ...
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक आलोक कुमार यांनी इतवारी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा करून तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली.
इतवारी रेल्वेस्थानकाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक गो. वि. जगताप, ए. के. सूर्यवंशी आणि शाखा अधिकारी उपस्थित होते. महाव्यवस्थापक आलोक कुमार यांनी इतवारी रेल्वेस्थानकावरील प्रवासी सुविधा, फूट ओव्हरब्रीज, गार्ड लॉबी, वेटिंग हॉल, विश्रामगृह, बुकिंग ऑफीस, पार्सल ऑफीसचे निरीक्षण केले. इतवारी रेल्वेस्थानकाचा कोचिंग टर्मिनलच्या रूपाने विकास करण्यात येत आहे. इतवारी नागभीड ब्रॉडगेज तसेच थर्ड लाईनचे काम पूर्ण झाल्यास भविष्यात इतवारीवरून अधिक रेल्वेगाड्या चालविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतर महाव्यवस्थापकांनी डीआरएम कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागातील विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच विभागात प्रवासी सुविधा वाढविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
................