बस पासेससाठी काऊंटर सुरू करण्याचा प्रस्ताव कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:22 AM2018-07-01T00:22:47+5:302018-07-01T00:27:05+5:30
‘आपली बस’ प्रकल्पांतर्गत महापालिका शहर बससेवा चालविते. यामुळे वर्षाला ५२.४७ कोटींचा तोटा होतो. आवश्यक सेवा म्हणून आर्थिक परिस्थिती बिकट असूनही हा तोटा सहन करावा लागतो. तोटा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गाजावाजा करून यासंदर्भात निर्णय घेतल्याचा दावा परिवहन समिती व विभागाकडून केला जातो. यातूनच उत्पन्न वाढीसोबतच विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी, या हेतूने पासेस देण्यासाठी शाळा-महाविद्यालयात काऊं टर (कक्ष) सुरू करण्याची घोषणा परिवहन समितीने केली होती. प्रत्यक्षात या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आपली बस’ प्रकल्पांतर्गत महापालिका शहर बससेवा चालविते. यामुळे वर्षाला ५२.४७ कोटींचा तोटा होतो. आवश्यक सेवा म्हणून आर्थिक परिस्थिती बिकट असूनही हा तोटा सहन करावा लागतो. तोटा कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गाजावाजा करून यासंदर्भात निर्णय घेतल्याचा दावा परिवहन समिती व विभागाकडून केला जातो. यातूनच उत्पन्न वाढीसोबतच विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी, या हेतूने पासेस देण्यासाठी शाळा-महाविद्यालयात काऊं टर (कक्ष) सुरू करण्याची घोषणा परिवहन समितीने केली होती. प्रत्यक्षात या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही.
शहरातील कोणत्या मार्गावर किती महाविद्यालये आहेत, विद्यार्थ्यांची संख्या व या मार्गावर धावणाऱ्या शहर बस, बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, खासगी वा अन्य वाहनांना वापर करणारे विद्याथीं याचा सर्वे करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला होता. सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांची यादी संकलित करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता. शाळा -महाविद्यालये सुरू झालीत. परंतु अद्याप काऊंटर सुरू करण्यात आलेले नाहीत.
महापालिकेच्या परिवहन विभागाला ५ डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१८पर्यंत ५५ कोटी ६२ लाख १५ हजार ८९५ एवढे उत्पन्न झाले. त्या तुलनेत महापालिकेने रेड बसच्या तीन आॅपरेटर्सला १०८ कोटी ९ लाख ६७ हजार ५२५ रुपये एवढी रक्कम दिली. या काळात ५२ कोटी ४७ लाख ५१ हजार ६३० रुपयांचा तोटा झाला. वाढता तोटा कमी करण्यासाठी २० टक्के भाढेवाढीचा प्रस्ताव २ जुलैला होणाऱ्या परिवहन विभागाने सर्वसाधरण सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.
ग्रीन बसमध्ये पासची सुविधा द्यावी
ग्रीन बसचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी ग्रीन बसच्या भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला होता. परंतु त्यानतंरही ग्रीन बसच्या उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही. अजूनही याा बसेस खाली धावतात. बसेस खाली सोडण्याऐवजी या बसमधून प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पास सुविधा देऊ न बसेसची व्यवस्था केली तर काही प्रमाणात का होईना उत्पन्नात वाढ होईल, असे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले. पासेससाठी काऊं टर सुरू
नियोजन नसल्याने तोटा वाढला
उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन समितीचे पदाधिकारी व अधिकारी करीत असले तरी त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. समितीतही अंतर्गत वाद व गटबाजी आहे. यामुळे ग्रीन बससोबतच अनेक रेड बस खाली धावत असल्याने तोटा वाढत आहे.
डेपोत बसेस खाली परततात
रात्रीच्या सुमारास बसस्थानकावरून सुटलेल्या बसेस अखेरच्या थांब्यावरून रात्री डेपोत परत येतात. या बसेस खाली असतात. यामुळे डिझेलचा खर्च वाढतो. याच बसेस अखेरच्या स्थानकावरून सकाळी सुटल्यास डिझेलच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. परंतु याकडे विभागाचे लक्ष नाही.