फेरीवाल्यांसाठी ५० जागा प्रस्तावित
By admin | Published: July 31, 2016 02:31 AM2016-07-31T02:31:34+5:302016-07-31T02:31:34+5:30
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी शहरातील महापालिका क्षेत्रातील ५० जागा फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे.
समितीची बैठक : स्थळांची पाहणी करण्यासाठी समिती
नागपूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी शहरातील महापालिका क्षेत्रातील ५० जागा फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे. नागपूर शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे. या जागांची पाहणी करून यावर १५ दिवसात शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
महापालिकेच्या बाजार विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर शहरात ३१ हजार फेरीवाले आहेत. यातील केवळ ३०६९ फेरीवाल्यांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. शुक्रवारी समितीच्या बैठकीत फेरीवाल्यांचा झोननिहाय आढावा घेण्यात आला. सुचविलेल्या ५० जागांचे सर्वेक्षण करण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. समिती प्रस्तावित ५० जागांना भेटी देऊ न संबंधित रस्त्यांची रुंदी, क्षेत्राचे क्षेत्रफळ, वाणिज्य क्षमता, शहर विकास आराखड्यानुसार रस्ता, ठिकाण व कोणत्या झोनमधील क्षेत्र आहे.
फेरीवाला क्षेत्रासाठी प्रस्तावित जागा
मेट्रो ट्रेन (जमिनीच्या ४० फुट आत तसेच मैदान), नेताजी मार्केट (बर्डी), टेम्पल बाजार व अपना बाजार(बर्डी), बुटी दवाखाना (बर्डी), कॉटनमार्केट अनाज गोदाम, कडबीबाजार चुंगी नाका मारवाडी गल्ली, महात्मा फुले भवन, पटवर्धन मैदान(भगवती मंदिरापुढे), मॉरिस कॉलेज अंडर ग्राऊं ड, शुक्रवारी रामकूलर चौक, राजविलास टॉकीजसमोर, पाचपावली उड्डाणपूल, कमाल टॉकीजसमोर, शनिवार बाजार, चांभार नाला ते टेका नाका, गड्डीगोदाम गोल बाजार, मंगळवारी बाजारच्या बाजूला, खामला डी.पी.आराखड्यानुसार त्रिमूर्तीनगर मटन मार्केट, रविनगर चौक नाला, गिट्टीखदान महापालिका शाळेपुढे, जरीपटका पोलीस स्टेशनसमोर, वैशालीनगर घाटाच्या बाजूला, इतवारी नंगा पुतळा, जुना पुस्तक बाजार(बर्डी), मॉरिस कॉलेज वसतिगृहाजवळ, हनुमाननगर विमा दवाखान्याच्या बाजूला, मिनीमातानगर मैदान, कळमना बाजारासमोर, दहीबाजार उड्डाणपूल, झांशी राणी चौक मातृसेवा संघापुढे, फुटपाथवर दोन फूट जागेवर, प्रजापती चौक, कच्छविसा बगिच्याबाहेर, वेअर हाऊ स वर्धमाननगर, लकडगंज बगिच्याबाहेर, होलसेल मार्केट, तीननल चौक, महाल बुधवार बाजार, अशोका कुल्फी बडकस चौक, सीताबर्डी मेन रोड, महाराजबाग चौक, सक्करदरा बुधवार बाजार, एसटी बसस्थानक, बकरा मंडी मोमीनपुरा, मुस्लीम लायब्ररी, चिल्ड्रेन पार्क पार्किंग, रामनगर चौक, पंजाबराव कृषी विद्यापीठ व चभडीया जागा.