गुन्हे लपविल्याचा खटला; देवेंद्र फडणवीस आरोपमुक्त, नागपूर न्यायालयाने खटला फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 07:34 IST2023-09-09T07:34:51+5:302023-09-09T07:34:58+5:30
दोन्ही वादग्रस्त फौजदारी प्रकरणे खासगी तक्रारींशी संबंधित होते.

गुन्हे लपविल्याचा खटला; देवेंद्र फडणवीस आरोपमुक्त, नागपूर न्यायालयाने खटला फेटाळला
नागपूर : २०१४ मधील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन प्रलंबित फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही म्हणून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध नागपुरातील ॲड. सतीश उके यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला खटला शुक्रवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळण्यात आला. न्या. संग्राम जाधव यांनी हा निर्णय दिला.
दोन्ही वादग्रस्त फौजदारी प्रकरणे खासगी तक्रारींशी संबंधित होते. एक प्रकरण कालांतराने मागे घेण्यात आले, तर एका प्रकरणात फडणवीस यांना आरोपमुक्त करण्यात आले. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात वादग्रस्त फौजदारी प्रकरणांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला, यासंदर्भात ठोस पुरावे नाहीत, असे कोर्ट म्हणाले.